शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

प्रियकराच्या मदतीने पतीचा दाबला गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:34 AM

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने रुमालाने गळा आवळून खून केला. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील शहाजानपूर येथे घडली. या घटनेने खळबळ उडाली असून, पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतले असून, पत्नी फरार झाली आहे.

ठळक मुद्देमाजलगाव तालुक्यात खळबळ : अनैतिक संबंधात ठरत होता अडसर

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने रुमालाने गळा आवळून खून केला. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील शहाजानपूर येथे घडली. या घटनेने खळबळ उडाली असून, पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतले असून, पत्नी फरार झाली आहे.बालासाहेब शिंदे (वय ४० वर्षे, रा. शहाजानपूर, ता. माजलगाव) असे मयताचे नाव आहे. कावेरी शिंदे ही पत्नी असून, विठ्ठल आगे हा तिचा प्रियकर आहे. कावेरी व विठ्ठलचे मागील चार वर्षांपासून संबंध आहेत. बालासाहेब पत्नी कावेरीला याबाबत समजून सांगितले. मात्र, तिने ऐकले नाही. आगे हा शेताचा शेजारी असल्याने दोघांची रोजच भेट होत असे. हा प्रकार बालासाहेबला खटकत होता. वारंवार सांगितल्यानंतरही पत्नी ऐकत नसल्याने ते त्रस्त होते. त्यांच्यात वादही होत असत. या वादाला कावेरी वैतागली होती. गुरुवारी रात्रीही दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. जेवण झाल्यानंतर पती - पत्नी दोघेही शेतात पाणी देण्यासाठी गेले. याचवेळी पत्नी कावेरीने प्रियकर विठ्ठलला बोलावून घेतले. अंधाराचा फायदा घेत बालासाहेब यांच्या गळ्यातीलच रुमालाने त्यांचा गळा आवळला. त्यानंतर बालासाहेब मयत झाल्याचे समजताच शेतासाठी लावलेल्या कुंपणाच्या तारेवर त्यांचा मृतदेह उलट्या अवस्थेत टाकला. बाजूला जाऊन विठ्ठलने विद्युत तारेला आकडा टाकला अन् हा अपघात वाटावा असे भासविले. त्यानंतर दोघेही घरी गेले.सकाळच्या सुमारास माजलगाव ग्रामीण पोलिसांना करंट लागून इसमाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ग्रामीण ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक विकास दांडे हे घटनास्थळी गेले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता, त्याच्या गळ्यावर नखाने ओरबाडल्याच्या खुणा व गळ्यातील रुमालाला गाठ मारल्याचे दिसले. त्यामुळे हा अपघात नसून, घातपात आहे असा संशय त्यांना आला. त्याप्रमाणे त्यांनी चौकशी सुरु केली.खबºयांमार्फत गावातील नागरिकांना विश्वासात घेतले. माहिती घेतल्यानंतर बालासाहेबची पत्नी कावेरी व विठ्ठलचे अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. तसेच गुरुवारी रात्री त्यांचे कडाक्याचे भांडण झाल्याचे समजले. दांडे यांनी ही माहिती उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांना दिली. त्यांनी ही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अवघ्या सहा तासातच प्रियकर विठ्ठलला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने कबुली दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. प्रियकरालाही ठाण्यात आणले. आपण रचलेला कट उघड झाल्याचे समजताच पत्नी कावेरीने गावातून धूम ठोकली. तिच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत. रात्री उशिरापर्यंत उप अधीक्षक भोसले, पो. उप नि. विकास दांडे, पो. ह. एम. डी. वडमारे, रवि राठोड, गोविंद बाबरे हे घटनास्थळी तळ ठोकून होते. याप्रकरणाची माजलगाव ग्रामीण ठाण्यात अशोक बादाडे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला.सहा तासात तपासअपघात म्हणून बनाव केलेल्या या प्रकरणाचा डॉ. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप नि. विकास दांडे यांनी अवघ्या सहा तासात या प्रकरणाचा तपास पूर्ण केला.गळ्यावरील नखाचे व्रण, गळ्यातील रुमालाला मारलेल्या गाठीवरुन हा घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला अन् त्यावरुन त्यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसCrime Newsगुन्हेगारी