लोकमत न्यूज नेटवर्कबीड : माजलगाव तालुक्यातील जय महेश साखर कारखान्याने शेतकºयांचे थकीत ऊस बील न दिल्यामुळे दोन दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकºयांचे पुणे येथील साखर संकुलासमोर ‘झोपडी निवास आंदोलन’ सुरू आहे.या विषयावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. मात्र कोणताही ठोस निर्णय व लेखी आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे ‘झोपडी’ आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय शेतकºयांनी घेतला आहे.माजलगाव तालुक्यातील एन.एस.एल. शुगर्स लि.युनिट संचलित जय महेश साखर कारखाना व्यवस्थापनाने, शेतकºयांना ऊसाच्या बिलाची रक्कम अद्याप दिली नसल्याने जय महेश साखर कारखान्याविरोधात दुसºया दिवशीही आंदोलन सुरुच आहे. जय महेश साखर कारखान्याने ऊस बिलाची रक्कम अद्याप दिली नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.झोपडी निवास आंदोलन’ अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी शेतकºयांनी दिला. यावेळी जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, आप्पासाहेब जाधव, राजश्री जाधव, सीता शेंडगे, मुंजाबा जाधव, रत्नाकर कदम, माऊली शेंद्रे, मतिंद्र शिंदे, गोविंद शेंडगेंसह शेतकरी उपस्थित होते.
‘झोपडी’ आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 11:40 PM