आष्टी : तुम्ही मला कटप्पा म्हणालात पण कटप्पा हे पात्र इमानदार नोकराचे आहे हे तुम्हाला माहीत नाही. जर मी कटप्पा असेल तर तुम्ही स्वत:ला बाहुबली म्हणवता; पण तुम्ही बाहुबली होऊ शकत नाही. मी कटप्पा असेन तर मग तुम्ही काय सेतूपती आहात का? पराभवाचे चिंतन करण्याची वेळ तुमच्यावर आली असल्याचे आ. सुरेश धस यांनी माजी आ. भीमराव धोंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले.आष्टी येथील जोगेश्वरी मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दशरथ वनवे, चंपाकाकी पानसंबळ, तात्यासाहेब हुले, महेंद्र गर्जे, दत्तात्रय गाडेकर, अशोक इथापे,भारत मुरकुटे, पांडुरंग चौधरी, अब्दुला सय्यद, रंगनाथ धोडे, आनंद जाधव, प्रकाश कवठेकर, सुरेश उगलमुगले आदी उपस्थित होते.धस यांनी धोंडे यांच्यावर चौफेर टीका केली. पराभवाचे खापर आमच्यावर फोडण्याचे काम करु नका. कटप्पा, बाहुबली, सेतूपती हे जर चालू ठेवायचं असेल तर ते ही सांगा, त्यालाही आम्ही तयार आहोत. प्रचाराच्या पॉम्प्लेटमध्ये एका बाजूने भाजपला मतदान करा म्हणायच आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूने घड्याळाचे चिन्ह टाकायचे हे काम कुणी केल? हे सर्वांना माहीत आहे. स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या काळातील जुन्या सहकाऱ्यांना तुम्ही विचारल नाही ही चूक कुणाची आहे. तुमचा भोंगळ कारभार झाला आहे. तुमच्या पराभवाचे खापर आमच्यावर कशाला फोडता अशी टीका धस यांनी केली. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन माऊली जरांगे यांनी केले तर आभार भारत मुरकुटे यांनी मानले.
मी कटप्पा असेन तर मग तुम्ही काय सेतूपती आहात का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 12:03 AM
तुम्ही मला कटप्पा म्हणालात पण कटप्पा हे पात्र इमानदार नोकराचे आहे हे तुम्हाला माहीत नाही. जर मी कटप्पा असेल तर तुम्ही स्वत:ला बाहुबली म्हणवता; पण तुम्ही बाहुबली होऊ शकत नाही. मी कटप्पा असेन तर मग तुम्ही काय सेतूपती आहात का? पराभवाचे चिंतन करण्याची वेळ तुमच्यावर आली असल्याचे आ. सुरेश धस यांनी माजी आ. भीमराव धोंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
ठळक मुद्देटीकास्त्र । सुरेश धस यांनी घेतला भीमराव धोंडेचा खरपूस समाचार