फोटो
पशुधनाचे लसीकरण ,वृक्षारोपण
शिरूर कासार : तालुक्यातील पशुधनाचे लसीकरण आणि वृक्षारोपणाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी संस्थानचे महंत स्वामी विवेकानंद शास्त्री, पद्मश्री शब्बीर मामू ,जिल्हा परिषदेचे सदस्य रामराव खेडकर, रामदास बडे, एम. एन. बडे, प्रकाश खेडकर, वनविभागाचे बद्रिनाथ परझणे, डॉ. प्रदीप आघाव, किशोर खोले, आदी मान्यवर उपस्थित होते. पै. माउली पानसंबळ यांच्या संकल्पनेतून हा सामाजिक उपक्रम घेण्यात आला.
शेतीकामे अंतिम टप्प्यात, पावसाची प्रतीक्षा
शिरूर कासार : मागील आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतीकामे अंतिम टप्प्यात आली आहेत. समाधानकारक पाऊस झाल्यानंतर उघडीप मिळाली. त्यानंतर खत, खुरपण, फवारणी, आदी कामे करण्यात आली. आता शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.
हाजीपुरमधे बारा कोरोनाबाधित
शिरूर कासार : जिल्ह्यात कोरोनाचा आकडा कमी होत असला तरी आष्टीसह शिरूर तालुक्यात कोरोनाचा आकडा कमी होत नसल्याची चिंताजनक परिस्थिती आहे. गुरुवारी प्राप्त अहवालानुसार तालुक्यात ३७ रुग्ण आढळून आले. एकट्या हाजीपूरमधे बारा बाधित रुग्ण निघाले. एखादा दिवस आकडा कमी येतो. मात्र लागलीच दुसऱ्या दिवशी आकडा दुपटीपेक्षा अधिक होत असल्याने कोरोनाची भीती अजूनही कमी होत नाही. सध्या कोरोनाचे ग्रामीण भागातच जास्त रुग्ण निघत असल्याचे अहवालानुसार दिसून येते.
डासांचा उच्छाद वाढला
शिरूर कासार : मोठा पाऊस नसल्याने शहरातील गटारी पूर्णपणे धुऊन गेल्या नाहीत. त्यामुळे कचरा व घाण तशीच साचून आहे. त्यात पाऊस थांबल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. जंतुनाशक पावडर तसेच धूरफवारणीची मागणी नागरिकांतून होत आहे.
290721\img20210729132815.jpg
फोटो मुगाला घुने