सध्या प्राप्त परिस्थितीत आपल्याकडे लसीकरण करून घेणे हाच एकमेव आणि मृत्युदर कमी करू शकणारा उपाय आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लस उपलब्ध करून जास्तीत जास्त लोकांना ती कशी देता येईल, यावर सरकारने लक्ष दिले पाहिजे, अशी सूचना डॉ. राजेश इंगोले यांनी प्रशासनाला केली आहे.
पहिल्या लाटेनंतरची चूक जर सरकार, प्रशासन याही वेळेस दुरुस्त करणार नसेल, गेल्या चुकीपासून शिकणार नसेल, तर मग जनता कोणाच्या भरवशावर जगणार आहे, असा सवालही डॉ. इंगोले यांनी केला आहे. लोकांनीही या महामारीत आपली जबाबदारी ओळखून कोरोना विषयक मार्गदर्शक सूचना, प्रतिबंधात्मक उपाय, मास्क, सॅनिटायझर वापरणे, सुरक्षित अंतर राखणे, गर्दी टाळणे या गोष्टी पाळाव्यात, असे आवाहनही डॉ. इंगोले यांनी केले आहे.