श्वानांचा बंदोबस्त करा
बीड : शहरातील अनेक भागात भटक्या श्वानांची संख्या वाढली आहे. हे भटके श्वान टोळक्याने बसत असल्याने रात्रीच्या वेळेस हे श्वान दिसून येत नसल्याने हल्ला चढवत आहेत. यामुळे अनेक नागरिक जखमी झाले आहेत. या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
दलालांचा सुळसुळाट
अंबाजोगाई : सामान्यांची कामे तातडीने व्हावीत, त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची दक्षता जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येते. मात्र, अंबाजोगाई तहसील कार्यालयात मात्र, दलालांची मोठी गर्दी वाढल्याने सामान्य माणसाला साध्या कामासाठीही हेलपाटे मारावे लागतात.
बोंडअळीने पोखरले
बीड : गेवराई तालुक्यातील जातेगाव परिसरात अतिवृष्टी आणि अवकाळीच्या तावडीतून बाहेर पडताच या भागात कपाशीला बोंडअळीने पोखरले आहे. एकरी केवळ एक ते दीड क्विंटल उतारा मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसत आहे.
खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त
केज : नांदूरघाट परिसरातील गावांत पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सदर खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.