सोमनाथ खताळ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : चालकाची नौकरी करून महिन्याकाठी दहा ते पंधरा हजार रूपये मिळायचे. मात्र हे ऐश करण्यासाठी कमी पडू लागले. त्यामुळे चालक असणारे पाच मित्र एकत्र आले आणि लुटमारीचा प्लॅन आखला. दीड कोटी रूपयांच्या सिगारेटचा टेम्पोही लुटला. मात्र, बीड पोलिसांच्या तावडीतून ते सुटू शकले नाहीत. त्यांच्या पुणे जिल्ह्यातील शिकरापूर परिसरात मुसक्या आवळल्या. झटपट लखपती बनण्यासाठी हे पाचही चालक मित्र गुन्हेगार बनले. ही लुटमार केल्यानंतर त्यांना ‘म्होरक्या’कडून लाखभर रूपये दिले जाणार होते.सादीक गुलाब पठाण (२९ जातेगाव बु.जि.पुणे), शोएम महमंद शेख (२१ दौलावडगाव ता.आष्टी जि.बीड ह.मु.शिकरापूर जि.पुणे), जितेंद्र सुभाष सुर्यवंशी (२८, जातेगाव बु.जि.पुणे), विशाल वैभव गायकवाड (२१, रा. कोंडापुरी ता.शिरूर जि.पुणे), रवि लक्ष्मण मुंडे (२२, हिवरे रोड, शिकरापूर जि.पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. १७ मे २०१९ रोजी गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी ते मादळमोही या दरम्यानच्या रस्त्यावर १ कोटी ३९ लाख रूपयांचे सिगारेट व इतर साहित्य घेऊन जाणार टेम्पो या पाच जणांनी लुटला होता. टेम्पो चालकाला करंजी (ता.पाथर्डी) येथे नेऊन मारहाण करून सोडले होते.दरम्यान, हे पाच आरोपी पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या कंपनीत चालक म्हणून काम करतात. त्यामुळे त्यांची ओळख झाली. ओळखीतून मैत्री. जितेंद्र हा चालाक होता. त्यानेच हा टेम्पो लुटीचा प्लॅन आखला. त्यांना एक ‘मार्गदर्शक’ सुद्धा आहे.हा टेम्पो लुटल्यानंतर मुद्देमाल विकून सर्व पैसे हा मार्गदर्शक घेणार होता. तर याचा परिश्रमापोटी या पाच जणांना एक ते दोन लाख रूपये देऊन खूश करणार होता, असे तपासातून समोर आले आहे.मात्र, हे पैसे मिळण्यापूर्वीच बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने या पाचीही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सपोनि अमोल धस आणि त्यांच्या टिमने ही कारवाई केली.पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी दबावटेम्पो चालक दत्ता हरीभाऊ दिवटे (२८ रा.बाबुर्डी ता.पारनेर जि. अहमदनगर) याला मारहाण करून पोलिसांना खोटी माहिती देण्यासाठी दबाव आणला होता. यासाठी दत्ताचे डोळे बांधून त्याला वेगवेगळ्या ठिकाणी फिरविण्यात आले होते. त्याला दुर लिंबाच्या झाडाकडे जावून हातवर कर असे सांगितले, तोपर्यंत यांनी धूम ठोकली होती.कोणाला कोठे आणि कसे पकडलेजितेंद्र हा शिकरापूर येथील एका पंपावर दुचाकीमध्ये इंधन भरत होता. खात्री पटताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने सहकाऱ्यांची नावे सांगितले. त्यानंतर शोएबला दौलावडगाव (ता.आष्टी) येथील हॉटेलवरून ताब्यात घेतले. इतर पाच जणांना त्यांच्या घरातून बेड्या ठोकल्या.
झटपट लखपती होण्याच्या नादात मित्र बनले गुन्हेगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 12:22 AM
चालकाची नौकरी करून महिन्याकाठी दहा ते पंधरा हजार रूपये मिळायचे. मात्र हे ऐश करण्यासाठी कमी पडू लागले. त्यामुळे चालक असणारे पाच मित्र एकत्र आले आणि लुटमारीचा प्लॅन आखला.
ठळक मुद्देपर्दाफाश : दीड कोटीच्या मुद्देमालातून मिळणार होते लाखभर रूपये