लोकमत न्यूज नेटवर्कगंगामसला : उन्हामुळे करपलेल्या पिकाचे, हुमणी अळीमुळे ऊसाच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात झाले आहे. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करु न शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी ५० हजार रु पये नुकसान भरपाई देण्याची मागणी शेकापच्या वतीने भाई अॅड. नारायण गोले पाटील यांनी केली.मंगळवारी या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. माजलगाव तालुक्यात उसाच्या पिकाचे हुमणी अळीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच पावसाअभावी तूर, कापूस, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन आदी पिके करपून जात आहेत. या पिकांचा पंचनामा करु न शेतकºयांना तत्काळ नुकसान भरपाई हेक्टरी ५० हजार रु पये प्रमाणे देवून त्यांच्या कुटुंबास शासनाने मदत करावी अशी मागणी केली आहे. निवेदनाची दखल न घेतल्यास शेकापच्या वतीने आंदोलनाचा ईशारा देण्यात आला. यावेळी भाई अॅड.नारायण गोले पाटील, अॅड.तुळशीराम रेडे, भाई रामेश्वर खेत्री, भाई सुभाष थोरात, विठ्ठल जाधव, गौतम सोळंके, बालासाहेब शिंदे,रतन राठोड, बाळू राठोड, आंबू चव्हाण, आसाराम घाटूळ आदी उपस्थित हाते.
‘माजलगाव तालुक्यातील करपलेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:14 AM