शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर गेले, सरवणकर दुसऱ्या, पहिला कोण?
3
महायुती-महाविकास आघाडीत ‘काँटे की टक्कर’; भाजपाला सर्वाधिक आघाडी, मनसेची स्थिती काय?
4
Kopri-Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live : ठाण्यातील कोपरी-पाचपाखडीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर, केदार दिघे पिछाडीवर…
5
कोकणात राणे बंधुंपैकी एक आघाडीवर, एक पिछाडीवर; सिंधुदूर्गचा कल कोणाकडे....
6
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०४ धावांत खल्लास! टीम इंडियाला मिळाली अल्प आघाडी
7
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights :भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल?, राहुल नार्वेकरांनी स्पष्टचं सांगितलं
8
Maharashtra Assembly Election 2024 Result Kandivali Vidhansabha : कांदिवली पूर्वेतून भाजपचे अतुल भातखळकर आघाडीवर, विजयाची हॅटट्रिक मारणार का?
9
शेअर बाजारात ५ महिन्यांचा उच्चांक; गुंतवणूकदारांनी ७.१५ लाख कोटी कमावले
10
अजित पवार गट टेन्शनमध्ये! येवल्यातून भुजबळ, अणुशक्ति नगरमधून नवाब मलिक पिछाडीवर
11
झारखंडमध्ये एनडीए आणि ‘इंडिया’त टफफाईट, सुरुवातीच्या कलांमध्ये दिसतंय असं चित्र
12
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर दक्षिणमध्ये मोठी घडामोड, अमल महाडिक २०१२ मतांनी आघाडीवर; कोण मारणार बाजी ?
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 बविआला राडा भोवणार! नालासोपाऱ्यात भाजपाचा उमेदवार आघाडीवर, क्षितिज ठाकूरांचा गेम होणार? 
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
16
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : Video - "पुन्हा एकदा..."; निकालाच्या दिवशी नेतेमंडळी सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक
18
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
19
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
20
व्हॉट्सॲप ग्रुपवरून ज्ञान, घरीच केली प्रसूती; चेन्नईतील खळबळजनक घटना

बीडमध्ये दोन ठिकाणी फटाका स्टॉलवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:13 AM

शहरातील बलभीम चौक व पेठ बीड भागात पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने फटाका स्टॉलवर धाडी टाकल्या. यामध्ये तब्बल सव्वा पाच लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळाच्या सुमारास झाली.

बीड : शहरातील बलभीम चौक व पेठ बीड भागात पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने फटाका स्टॉलवर धाडी टाकल्या. यामध्ये तब्बल सव्वा पाच लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळाच्या सुमारास झाली. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हेही दाखल झाले आहेत.बीड शहर ठाणे हद्दीत लोकवस्ती असलेल्या बलभीम चौकात सुनीलकुमार गोवर्धनदास कुकडेजा (रा.बीड) हा अनधिकृतपणे फटाका विक्री करीत होता. तसेच मोठा साठाही त्याने करून ठेवला होता. त्याच्या गोदामावर छापा टाकून २ लाख ८८ हजार रूपयांचे फटाके जप्त केले. त्याच्यावर शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.ही कारवाई होताच पेठबीड भागातील सतीष भगवानअप्पा नगरे (रा.बुरूडगल्ली, बीड) याच्या मालकीच्या गोडाऊनवर छापा टाकला. यामध्ये २ लाख ३४ हजार रूपयांचे फटाके जप्त करण्यात आले. दोन कारवायात मिळून ५ लाख २२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नगरे विरोधात पेठबीड ठाण्यात गुन्हा नोंद आहे. ही कारवाई पोउपनि रामकृष्ण सागडे, गणेश नवले, अंकुश वरपे, पांडुरंग देवकते, रेवननाथ दुधाने, जयराम उबे आदींनी केली.२ वर्षापूर्वीच परवाना रद्दकुकडेजा आणि नगरे यांना शहरात फटाके विक्री करण्यास बंदी घातलेली आहे.२०१७ सालीच त्यांचे शहरातील परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. दोघांनाही शहराबाहेर साठा करण्याची परवानगी आहे.असे असतानाही त्यांनी लोकवस्तीत अनधिकृतपणे फटाक्यांचा साठा करून ठेवत नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका होईल, असे कृत्य केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडBeed S Pपोलीस अधीक्षक, बीडCrime Newsगुन्हेगारी