शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
3
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
4
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
5
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
6
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
7
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
8
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
9
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
10
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
11
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
12
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
13
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
14
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
15
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
16
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
17
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
18
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
19
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'

कोल्हापूरमध्ये ऊसाच्या फडात मुले असतानाही दाखवली बीडमध्ये हजेरी; सुमोटो याचिका दाखल

By सोमनाथ खताळ | Published: August 06, 2024 1:18 PM

बीडची १८३९ मुले कोल्हापूरमध्ये उसाच्या फडात; 'लोकमत' मधील बातमीवर सुमोटो याचिका

बीड : बीड जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील १८३९ मुले हे कोल्हापूरच्या वेगवेगळ्या ११ कारखान्यांवर ऊसतोडणी काम करणाऱ्या पालकांसोबत होते. ही बाब कोल्हापूरच्या 'अवनी' संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाली होती. त्याची यादी मिळताच उलट तपासणी केली. यात ही मुले बीडमधील शाळेच्या हजेरीपटावर उपस्थित असल्याचे उघड झाले होते.

बीड शिक्षण विभाग, राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानचे तत्त्वशील कांबळे आणि जागर प्रतिष्ठानचे अशोक तांगडे यांनी यासाठी काही शाळांची तपासणी केली होती. हाच प्रकार 'लोकमत'ने १२ मार्च आणि २४ मार्च २०२४ रोजी वृत्त प्रकाशित करून चव्हाट्यावर आणला होता. याचीच दखल घेत मानवी हक्क आयोगाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. याची ३१ जूलै रोजी एक सुनावणी झाली असून पुढील सुनावणी ही २६ ऑगस्ट रोजी होणार आहे. यात अवनी संस्थेला बोलावण्यात आले आहे.

यांना केली पार्टी?याचिकामध्ये प्रधान सचिव शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यात पार्टी करण्यात आले आहे.

यादीची उलट तपासणी केलीअवनी संस्थेने पाठविलेल्या यादीची उलट तपासणी केली होती. तीन शाळांना भेटी दिल्यावर ही मुले कोल्हापूरमध्ये असतानाही त्यांची हजेरी बीडमध्ये असल्याचे दिसले होते. यासंदर्भात शिक्षण विभागाकडे वारंवार विचारणा करण्यात आली, परंतु त्यांनी दुर्लक्ष केले. आता याचिका दाखल झाल्याने सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली आहे.- तत्त्वशील कांबळे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान, बीड

कार्यवाही व्हायला हवीकोल्हापूरमध्ये ८० टक्के ऊसतोड मजूर हे बीड जिल्ह्यातील येतात. त्यांच्या मुलांचे सर्वेक्षण केले होते. त्याची उलट तपासणी केल्यावर अनेक धक्कादायक माहिती समोर आल्या. यात ‘लोकमत’ने आवाज उठविल्याने आयोगाने सुमाेटो याचिका दाखल करून घेतली. यात योग्य ती कार्यवाही व्हायला हवी. आता आमच्या संस्थेलाही मुंबईच्या कार्यालयात बाेलावले आहे.- अनुराधा भोसले, अध्यक्षा, अवनी संस्था, कोल्हापूर

अवनी संस्थेने काय केले होते ?कारखान्यांना भेटी - ११कुटुंब संख्या - १९५८एकूण मुले - १८३९

किती मुले आढळली?० ते ३ वयोगट - ३३५४ ते ६ वयोगट - ३५३७ ते १४ वयोगट - ६५३१५ ते १८ वयोगट - ४९८

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेEducation Sectorशिक्षण क्षेत्रFarmerशेतकरीBeedबीडkolhapurकोल्हापूर