- पुरुषोत्तम करवामाजलगांव: पुरुषोत्तमपुरीचा रस्ता हा भाविकांसाठी काळ ठरु लागला आहे. चारच दिवसांपूर्वी भाविकांची वाहतूक करणारा अॅटोरिक्षा उलटल्याची घटना ताजी असताना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास हूल देण्याच्या प्रयत्नात दोन रिक्षांचा अपघात झाला. यात दोन महिला भाविक गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथून बालाजीनगर भागात राहणाऱ्या सुमारे ५० महिला भाविक खाजगी ट्रॅव्हल्सने पुरुषोत्तमपुरीत दर्शनासाठी आल्या होत्या. पुरुषोत्तमपुरी फाटयापासुन ते गावापर्यंतचा सुमारे ३ कि.मी. ऑटोरिक्षांनी जावे लागते. सुरुवातीला ट्रस्टच्यावतीने खाजगी बस लावून गावापर्यंत व्यवस्था करण्यात आली होती. परंतु, या ठिकाणी असलेल्या तसेच आजुबाजुच्या गावांतील अॅटोरिक्षावाल्यांनी मुजोरी करीत ट्रस्टच्यावतीने सुरु करण्यात आलेली व्यवस्था बंद पाडली.
रिक्षा चालकांची मनमानीयेथे अॅटो रिक्षा चालकांची मनमानी सुरू आहे. मनमानी भाडे वसूल करुन रत्यावर बेशिस्तपणे रिक्षा चालवली जात असल्आयाने अपघात नित्य झाले. एकमेकांच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात हूल देताना अपघात होत असल्याची माहिती रिक्षातील भाविकांनी दिली. रिक्षा चालकांच्या एकमेकांच्या स्पर्धेचा परिणाम हा भाविकांना भोगावा लागत असून छत्रपती संभाजीनगर येथील पुजा गणेश यशवंते (३०), संगीता गुलाबराव सोनवणे (५५) या दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना गावातील उमेश गोळेकर, गोविंद गोळेकर, संदीप शेळके व वसंत लोखंडे या युवकांनी जखमींना उपचारासाठी माजलगाव येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले.