- नितीन कांबळेकडा- उससतोड मजुराचे दरवाढीची बैठक आटपून पुण्याहून पाटोद्याला येत असताना साकत रोडवरील महासांगवी येथे गाडी अडवून चार जणांनी मारहाण करत गळ्यातील सोन्याची चैन व रोख रक्कम अशी पाच लाखांचा ऐवज लंपास केला. ही वाटमारीची घटना २७ डिसेंबर रोजी रात्री अकराच्या दरम्यान घडली.या प्रकरणी गुरुवारी ( दि. २८ ) पाटोदा पोलिस ठाण्यात अज्ञात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटोदा तालुक्यातील ढाळेवाडी येथील उसतोड मजूर मुकादम तात्यासाहेब दगडू हुले हे २७ डिसेंबर रोजी पुणे येथील वसंत दादा शुगर इन्स्टिटय़ूट मांजरी येथून मजुरी दरवाढ बाबत बैठकीसाठी गेले होती. बैठक आवरून मुकादम हुले स्काॅर्पिओ गाडीने ( एम.एच २३,ई.९९२५) तीन मित्रांसोबत गावाकडे परत निघाले. रात्री अकरा वाजेच्या दरम्यान साकत रोडवरील महासांगवी येथे चार जणांनी त्यांची गाडी अडवली. धाक दाखवत मारहाण करत गळ्यातील १०० ग्रॅम सोन्याची चैन,रोख रक्कम २ लाख रुपये असा एकूण ५ लाखांचा मुद्देमाल लंपास केला.
या प्रकरणी तात्यासाहेब दगडू हुले ( रा.ढाळेवाडी ता.पाटोदा) यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बी.एस.सपकाळ करीत आहेत.