: येथील सुंदरराव सोळंके महाविद्यालयामध्ये दोनदिवसीय ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट विभागाचे संचालक प्रोफेसर डॉ. एन. एन. बंदीला यांच्या हस्ते करण्यात आले. या परिषदेचे अध्यक्ष म्हणून आ. प्रकाश सोळंके उपस्थित होते.
सुंदरराव सोळंके महाविद्यालयात २१ व २२ जानेवारीला प्राणिशास्त्र विषयात ‘गोड्या पाण्यातील मत्स्यपालनाच्या नवीन संशोधनपद्धती’ या विषयावर दोनदिवसीय ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. यावेळी त्रिभुवन काठमांडू येथील डॉ. एस. एन. लाभ, प्रयाग (उत्तरप्रदेश) येथील प्रो. डॉ. एस. के. वर्मा आणि राजश्री शाहू महाविद्यालय लातूरचे प्रो. डॉ. विश्वास शेंबेकर यांची उपस्थिती होती. दोन दिवस चालणाऱ्या या ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भारतासह नेपाळ, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, इराण,चीन, फिलिपाईन्स, पाकिस्तान आदी देशांतील ४७० प्राध्यापक व संशोधकांनी सहभाग घेतला आहे. वेगवेगळ्या विषयांवर आठ चर्चासत्रांमध्ये प्राणीशास्त्र विषयावर सखोल मार्गदर्शन केले जात आहे. या परिषदेचे सूत्रसंचालन डॉ. सुरेश देशमुख यांनी केले. तर डॉ. प्रदीप ब्रह्मपुरीकर यांनी आभार मानले. आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार, समन्वयक डॉ. आर. टी. पवार यांनी परिश्रम घेतले.