गेवराई : तालुक्यातील रामपुरी येथे सोमवारी सकाळी कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील रामपुरी येथे लसीकरण केंद्राचे उदघाटन सरपंच विठ्ठल तायडे, डाॅ. मुकेश कुचेरिया यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अंकुश मस्के, सुभाष मस्के, सुधीर मस्के, चाळक, वखरे, मुंढे, जाधव, विलास मस्के, योगेश मस्के, आण्णासाहेब मस्के यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद याच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. येथील आरोग्य केंद्रात सोमवारपासून लसीकरणाला सुरूवात झाली असून, गावातील सर्व ग्रामस्थांनी ही कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश कुचेरिया यांनी केले.
===Photopath===
050421\sakharam shinde_img-20210405-wa0027_14.jpg