धारुर येथे मनसेच्या वतीने सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ धारुर येथील मनसे कार्यालयासमोर करण्यात आला. १४ मार्च ते १२ एप्रिल दरम्यान ही सदस्य नोंदणी मोहीम गावांगावात राबवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे, तालुकाध्यक्ष विठ्ठल शिनगारे, शहराध्यक्ष भारतराव विखे, तालुका उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख, विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिनगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी तालुकाप्रमुख विठ्ठल शिनगारे यांनी सांगितले की तालुक्यात गावागावात जाऊन ही मोहीम राबवणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे यांनी मनसेच्या बांधणीचे स्वरूप व पक्षाचे ध्येयधोरण या विषयावर मार्गदर्शन करून सदस्य नोंदणी जोमाने करावी, असे आवाहन केले
यावेळी वैजनाथ देशमुख, प्रशांत शिनगारे, राजेश शिनगारे, नीलेश शिनगारे, अजित शिनगारे, योगेश अंधारे, जनक फुन्ने, सारंग खिंडरे, सागर विखे, राजेश शिनगारे उपस्थित होते.