अंबाजोगाई : शहरापासून यशवंतराव चव्हाण चौक ते अंबासाखर कारखाना हा चौपदरी रस्ता तयार झाला आहे. या रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने भरधाव वेगाने चालवली जात आहेत. प्रत्येक वाहनचालक या रस्त्यावरून वेगाने धावण्याची स्पर्धाच करू लागला आहे. या भरधाव वेगातील वाहनांमुळे लहान-मोठे अपघात या परिसरात सातत्याने होऊ लागले आहेत. वाहने चालवताना वेग नियंत्रणात ठेवावा व अपघात टाळावा, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.
वाहतूक नियंत्रणासाठी गतिरोधक बसवा
माजलगाव : शहरातील मुख्य रस्त्यासह संभाजी चौक, सिंदफणा पात्रापर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
राज्यमार्गाला अतिक्रमण विळखा
केज : अंबाजोगाई - मांजरसुंबा या राज्य मार्गावर अतिक्रमणाचा विळखा असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आहे. या दरम्यानच बसस्थानक, शिवाजी चौक व प्रमुख बाजारपेठ असल्याने कोंडी होत आहे.
पंपावर पारदर्शक पाईप बसवावा
तेलगाव : अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर टाकीमध्ये पेट्रोल न टाकता, नागरिकांचे फसवणूक केली जाते. पेट्रोल टाकत असताना ते आपल्या टाकीत पडते का? हे नागरिकांना दिसावे, यासाठी पेट्रोल भरण्यासाठी असलेला पाईप पारदर्शक असावा, अशी मागणी होत आहे.