कोरोनाची भीती
अंबाजोगाई : शासनाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा अंबाजोगाई तालुक्यात सुरू केल्या आहेत. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन होत असले तरी शाळेमध्ये विद्यार्थी जाण्यास अजूनही धजावत नाहीत. कोरोनाच्या भीतीमुळे पालकही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत साशंक आहेत.
आजारांना निमंत्रण
अंबाजोगाई : शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात फास्ट फूडचे फॅड वाढले आहे. तालुका व शहरात ठिकठिकाणी वडापाव, पॅटीस असे अनेक खाद्यपदार्थांचे गाडे रस्त्याच्या बाजूला उभे आहेत. गाड्यांच्या बाजूला साचलेला कचरा, वाहणाऱ्या नाल्यांमुळे अस्वच्छता असते.
झाडे बहरली
बीड : शहरातील दुभाजकांच्या मध्ये नगरपालिकेच्या वतीने सुशोभिकरणासाठी झाडे लावण्यात आली आहेत. पाऊस व पाणी दिल्यामुळे ती चांगलीच बहरली असून सुशोभित दिसू लागली आहे. या झाडांना पालिकेकडून नियमित पाणी दिले जात आहे. यात सातत्याची मागणी होत आहे.