वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला : होम आयसोलेट कोरोनाबाधितांसाठी लाभदायक
बीड : सध्या कोरोनाबाधितांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. जे रूग्ण होम आयसोलेट आहेत त्यांनी घरीच पालथे झाेपल्यास रक्तातील ऑक्सिजन पातळी वाढू शकते. वैद्यकीय तज्ज्ञांनी याबाबत सल्ला दिला आहे. त्यामुळे घरच्याघरी उपचार घेऊन बरे होण्यासाठी हा सल्ला लाभदायक ठरणार आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोनाग्रस्त रुग्णांना, विशेषत: होम आयसोलेशनच्या रुग्णांना पालथे झोपण्याचा सल्ला दिला आहे. या रूग्णांनी पालथे (प्रोन) झोपल्यास त्यांच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण वाढते. श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तो काही प्रमाणात कमी होतो. पाठ बेडवर टाकून उताने झोपलेल्या रुग्णाला हळुवारपणे पोटावर झोपवण्याने (पालथे) रक्तातील ॲाक्सिजनची पातळी (एसपीओ२) वाढते. ॲाक्सिजनेशन नीट व्हावे म्हणून पालथे झोपवणे या पद्धतीचा स्वीकार आधुनिक वैद्यकशास्त्राने केल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. तसेच रुग्ण जर होम आयसोलेशन मध्ये असेल तेव्हा, त्याच्या ऑक्सिजनच्या तपासणीबरोबरच तापमान, ब्लडप्रेशर आणि रक्तातील साखरेची पातळी याची नियमित तपासणी केली जाते.
रक्तातील ऑक्सिजनच्या प्रमाणात होणारी कमतरतेचे लवकर निदान झाले नाही तर गुंतागुंती वाढतात. वेळेवर पालथे झोपवले व श्वसनास मदत केली तर अनेक रुग्णांने प्राण वाचवता येतील, असे वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. संजय जानवळे यांनी सांगितले.
काय आहेत फायदे?
पालथे झोपवताना एक उशी मानेखाली, दोन उश्या छातीखाली तर दोन उश्या चेह-याखाली ठेवाव्यात. अर्धा ते दोन तास पालथे नंतर तेवढाच वेळ उजव्या कुशीवर. नंतर अर्धा तास उठून बसणे व अर्धा तास ते दोन तास डाव्या कुशीवर नंतर पुन्हा पालथे झोपणे अशाप्रकारे वारंवार स्थिती बदलणे उपयुक्त ठरते. हे वारंवार करावे. पालथे झोपल्याने श्वसन सुधारते, फुफ्फुसातील वायुकोषिका उघडल्या जातात आणि श्वास घेणे सुलभ होते. हे याचे फायदे आहेत.
याकडेही लक्ष असूद्या...
जेवणानंतर कमीत कमी एक तास तरी पालथे झोपू नका. जोपर्यंत तुम्हाला सहन होईल तोपर्यंतच पालथे झोपा. एखादी व्यक्तींला २४ तासांत १६ तासही पालथे झोपणे शक्य होऊ शकते. मात्र महिलांना गर्भारपण असेल, डीप व्हेन थ्रोंबोसिससारखे रक्तवाहिन्यांचे आजार असतील, ह्रदयाचे गंभीर आजार किंवा पाठीच्या मणके, कटिबंध (पेल्वीस), मांडीचे हाड (फिमर) यांचे फ्रॅक्चर असल्यास पालथे झोपू नये.
आहारासोबत व्यायामही महत्वाचा
शहरातील बालराेगतज्ज्ञ डॉ.संजय जानवळे यांना गत महिन्यात कोरोनाने घेरले होते. त्यांना त्रासही झाला. परंतू त्यांनी यावर मात केली. आहार व व्यायाम करणेही महत्वाचे आहे. डॉ.जानवळे यांनी कोरोनाला हरवून आल्यानंतर १५ किलाेमिटर न थांबता धावतात. त्यामुळे बाधितांसह सामान्य नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. पण हे करताना व्यायाम देखील करावा. यामुळे आरोग्य सदृढ राहण्यास मदत होईल, असे सांगितले.
===Photopath===
020521\185002_2_bed_37_02052021_14.jpg
===Caption===
डॉ.संजय जानवळे