बीड : आष्टी तालुक्यातील हंबर्डे वस्ती येथील कल्याण लक्ष्मीकांत धोंडे यांनी १७ डिसेंबर २०१२ रोजी व्याजाचे पैसे मागणाऱ्याने त्रास दिल्यामुळे राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त करणा-या सावकाराला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली आहे.आष्टी तालुक्यातील हंबर्डे वस्ती येथील कल्याण लक्ष्मीकांत धोंडे यांनी रवींद्र विठ्ठल पारखे (रा. हंबर्डे वस्ती) याच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. धोंडे यांच्याकडे असलेले व्याजाचे पैसे वारंवार मागणी करीत पारखे हे त्यांना त्रास देत होते. याच मानसिक त्रास व छळाला कंटाळून धोंडे यांनी १७ डिसेंबर २०१२ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यामध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सावकार रवींद्र पारखे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणाचा तपास पोलीस उप निरीक्षक एन. एम. शेख यांनी केला. तपासी अधिकारी यांनी आरोपीविरूद्ध सबळ पुरावा गोळा करून गुन्ह्याच्या तपासाअंती मुदतीत अंतिम दोषारोप पत्र न्यायालयास सादर केले. याप्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्या. बीड - ५ डी. एन. खडसे यांच्या न्यायालयात झाली. सदर प्रकरणातील फिर्यादी पंच, साक्षीदार वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी यांची साक्ष आणि परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरत आरोपी रवींद्र पारखे याला दोषी धरून १० वर्षे सश्रम कारावास, १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणात सरकारी पक्षाची बाजू जिल्हा सरकारी वकील आर. पी. उदार यांनी मांडली. महिला पोलीस हवालदार आर. एन. सिरसाम यांनी पैरवीचे कामकाज पाहिले.
आत्महत्येस प्रवृत्त केले; १० वर्षे सश्रम कारवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 11:48 PM
आत्महत्येस प्रवृत्त करणा-या सावकाराला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली आहे.
ठळक मुद्देबीड जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला निर्णय