बीड : शहरातील अनेक भागात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. हे भटके कुत्रे टोळक्याने बसत असल्याने रात्रीच्या वेळेस हे कुत्रे दिसून येत नसल्याने हल्ला चढवत आहेत. यामुळे सहा नागरिक जखमी झाले आहेत. बंदोबस्ताची मागणी आहे.
दलालांचा सुळसुळाट
अंबाजोगाई : सामान्यांची कामे तातडीने व्हावीत याची दक्षता जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येते. मात्र, अंबाजोगाई तहसील कार्यालयात मात्र, दलालांची मोठी गर्दी वाढल्याने सामान्य माणसाला साध्या कामासाठीही हेलपाटे मारावे लागतात.
वाहतुकीची कोंडी
गेवराई : शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूंनी अतिक्रमण, छोटी दुकाने असल्याने तसेच रस्त्यापर्यंत विक्रेते हातगाडे उभे करीत असल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी होते.
भिंतीची गरज
धानोरा : नगर-बीड रस्त्यावरील धानोरा, अंभोरा फाटा दरम्यान रस्त्याच्या वळणांवर असलेले संरक्षक कठडे तुटले आहेत. संरक्षक कठडे तुटल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. तरी संरक्षक कठडे तातडीने बांधावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे