-------------------------------
बसस्थानक बनले वाहनतळ
अंबाजोगाई : बसस्थानक परिसरात व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने व वाहनधारक मार्गातच वाहने उभी करीत असल्याने बसस्थानकाला वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वाहनांच्या गर्दीत बसस्थानक हरविल्याने भरधाव येणारी वाहने उभी करण्यासाठी पर्यायी जागा नसल्याने अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता बळावली आहे.
----------------------- --------
जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार काही भागांत सर्रास सुरू असून, जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
--------------------------------
पुस्तकविक्रेत्यांना शाळेची प्रतीक्षा
अंबाजोगाई : शाळा सुरू करण्यासंदर्भात शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहे. त्यामुळे पुस्तक विक्रेत्यांना ग्राहक येतील, अशी आशा लागली आहे. यावर्षी सप्टेंबर महिना उजाडला असतानाही अद्यापही शाळा, महाविद्यालये सुरू झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पाहिजे त्या प्रमाणात पुस्तकांची तसेच शालेय साहित्याची खरेदीच केली नाही. परिणामी विक्रेते शाळा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
------------------------------------
आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता
अंबाजोगाई : शहरात काही भागांत उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री केली जात असल्यामुळे यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे उघड्यावरील पदार्थांमुळे आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन्न औषध प्रशासन विभागाने याकडे लक्ष देऊन व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.