बीड : जिल्ह्यतील एकूण १२९ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले होते. १८ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीमध्ये आमदार विनायक मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड तालुक्यातील कर्झनी, पिंपळगाव घाट, वरवटी धानोरा, पालवन, मानेवाडी, बेलखंडी पाटोदा तसेच शिरूर तालुक्यातील येवलवाडी वंजारवाडी, टाकळवाडी धनगरवाडी खरगवाडी, हटकरवाडी आवळवाडी व गेवराई तालुक्यतील भडंगवाडी, गंगावाडी या ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित केले, असा दावा शिवसंग्रामचे नेते रामहरी मेटे यांनी केला.
शिवसंग्राम भवन येथे सर्व ग्रामपंचायतींच्या विजयी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसंग्रामचे नेते रामहरी मेटे, सुधीर काकडे, नवनाथ प्रभाळे, सुहास पाटील, विनोद कवडे, बबनराव माने, सचिन कोटुळे, गणेश मोरे, कैलास शेजाळ, शेषेराव तांबे, अक्षय माने, मनोज जाधव, राजू येडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.