बीड : शासनाने २७ फेब्रुवारीच्या निर्णयानुसार शिक्षक बदल्यांची प्रक्रिया राबवावी असा निर्णय घेतल्यानंतर यातील पध्दतीला विरोध दर्शवित शिक्षक संघटना रोष व्यक्त करत आहेत. २३ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पोर्टल कोलमडल्याने पूर्ण होऊ शकली नाही. यातच २११ बदलीपात्र शिक्षकांनी अद्याप आॅनलाईन अर्ज भरले नसून ५१ शिक्षकांचे अर्ज व्हेरीफाय झाले नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे बदल्यांचे गु-हाळ तांत्रिक अडचणींमुळे लांबण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात ५ हजार ४३९ शिक्षक बदली पात्र ठरले आहेत. दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्याने त्यांना अर्ज भरण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. परंतु यातील संवर्ग १ व २ मधील ९० टक्के एकल शिक्षकांपुढे सुरक्षेचा प्रश्न आहे. ही बदली पद्धती अन्याय करणारी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आॅनलाईन बदल्यांसाठीचे अर्ज भरताना शिक्षकांची दमछाक झाली. बदल्यांचे पोर्टल सर्व्हर डाऊन झाल्यामुळे शिक्षकांना अर्ज अनेकवेळा भरावा लागत होता.
यासाठी बहुतांश शिक्षकांनी रात्र- रात्र जागून काढली. तरीही २११ शिक्षकांनी अर्ज भरले नसल्याची बाब समोर आली. तसेच इतर ५१ शिक्षकांच्या अर्जाची पडताळणी झाली नाही. त्यामुळे आधी या शिक्षकांना अर्ज दाखल करावे लागणार आहेत. त्यांना अर्ज भरण्यासाठी ठराविक कालावधीची सवलत देण्यासाठी शिक्षण विभागाने वरिष्ठांकडून मार्गदर्शन मागविले आहे. उद्भवणाºया तांत्रिक अडचणींवर मार्ग काढण्याबाबत शिक्षण विभागाची यंत्रणाही पेचात आहे.
जिल्ह्यात तीन वर्षांपुर्वी १४३६ प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या होत्या. परंतू त्या भाषा, गणित, विज्ञान विषयवार झाल्या नव्हत्या. केवळ घोडेबाजाराला महत्त्व देण्यात आले होते. आता शासन निर्णयाप्रमाणे होणा-या बदली प्रक्रियेत अडथळे येण्याची शक्यता आहे. १४३६ शिक्षकांना दर्जावाढ अगोदर करणे आवश्यक आहे. मागे झालेल्या चुकीच्या पदोन्नतीमुळे गोंधळ वाढण्याची शक्यता अधिक आहे. या नियुक्त्या रद्द करण्याबाबत प्रस्तावही निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. या शिक्षकांना जेथे नियुक्त केले जाणार तेथे पटसंख्या नियमाप्रमाणे असणे गरजेचे आहे. त्यामुळे शिक्षक बदल्यांचे गु-हाळ सुरुच राहणार आहे.शिक्षक मोर्चाचे नियोजन
बदल्यांना विरोध नाही, परंतु चुकीच्या पध्दतीला विरोध आहे. निम्मे शैक्षणिक वर्ष संपले आहे. अशा वेळी बदल्या केल्या जात आहेत. २७ फेब्रुवारी २०१७ चा शासन निर्णय रद्द करावा, २०१४ च्या सर्वसमावेशक निर्णयानुसार बदल्या कराव्यात या मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या असून एकच समन्वय समिती स्थापन केली.
श्रेयासाठी नव्हे, न्यायासाठी बीड येथे ३० आॅक्टोबर रोजी काढण्यात येणाºया मोर्चाच्या अनुषंगाने शिक्षक समन्वय समितीच्या बैंकीत ठरल्याप्रमाणे मोर्चाच्या अग्रभागी सर्व शिक्षिका राहणार आहेत. त्यानंतर पदाधिकारी व शिक्षक राहणार आहेत. प्रशासनाला शिक्षिकाच निवेदन देणार असून भाषणही त्याच करणार आहेत.
अशा होणार बदल्यासहशिक्षक ४०४८मुख्याध्यापक ३३५प्राथमिक पदवीधर १०५६एकूण ५४३९