हॉर्नचा त्रास
गेवराई : येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात वाहनचालक कर्णकर्कश हॉर्न वाजवत असल्याने रुग्णांसह सर्वसामान्यांना त्याचा त्रास होत आहे. अनेकवेळा वाहनधारक नागरिकांच्या जवळ येऊन मोठे हॉर्न वाजवत असल्याने नागरिक मोठ्या आवाजाने दचकत आहेत.
अवैध धंदे वाढले
जातेगाव : गावापासून जवळच असलेल्या फाट्यावर बंद झालेले अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू आहेत. हॉटेल, पानटपरी तसेच शेडमध्ये मटका, जुगार खेळविला जातो. तसेच अवैधरीत्या दारूची विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कचरा वाढू लागला
बीड : शहरातील जिल्हा क्रीडासंकुल, जुने गोदाम परिसरात मोठ्या प्रमाणावर परिसरातील नागरिक आणि व्यापारी कचरा आणून टाकत आहेत. त्यामुळे दुर्गंधी सुटत असून, काही वेळा कचऱ्यास आग लावण्याचेही प्रकार निदर्शनास येत आहे. हा कचरा वेळोवेळी उचलून न्यावा, अशी मागणी होत असून, याकडे दुर्लक्ष होत आहे.