शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

झटपट सोयाबीन; भाव वाढल्याने शेतकऱ्यांचा वाढला कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 4:41 AM

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात कापूस हे सर्वाधिक क्षेत्रावर घेण्यात येणारे जिल्ह्यातील पीक होते. मात्र, मागील काही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात कापूस हे सर्वाधिक क्षेत्रावर घेण्यात येणारे जिल्ह्यातील पीक होते. मात्र, मागील काही वर्षांत कापसाचे उत्पन्न व त्या तुलनेत होणारा खर्च जास्त असल्यामुळे व सोयाबीनच्या दरात वाढ होत असल्याने, शेतकऱ्यांचा कल सोयाबीन पिकाकडे वाढत असून, क्षेत्रदेखील वाढले आहे. मात्र, या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे उतारा कमी येण्याची शक्यता आहे.

काही वर्षांपूर्वी जिल्ह्यातील शेतकरी कापसाचा अधिक पेरा करीत होते. परंतु, बोंडअळीमुळे कापूस पिकांतून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न हाती मिळत नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळले आहेत. चालू वर्षात जवळपास ३ लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. कमी वेळात सोयाबीन उत्पादन देणारे बियाणे बाजारपेठेत दाखल झाले आहेत. त्यामुळे अनेकांचा कल या कमी कालावधीत येणाऱ्या सोयाबीनकडे आहे. विशेष म्हणजे यंदा सोयाबीनला बाजारपेठेत १० ते ११ हजार रुपयांचा सरासरी दर मिळत आहे. या दरामध्ये पुढील काही कालावधीत वाढ होण्याची शक्यता जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी व व्यापारी व्यक्त करीत आहेत.

...

झटपट येणारे सोयाबीन

सोयाबीनचे ८० ते ९० दिवसांत उत्पादन देणारे काही बियाणे जिल्ह्यात उपलब्ध आहेत. अनेक शेतकरी या बियाण्यांची ट्रॅक्टरद्वारे पेरणी करतात. तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याने कमी वेळेत उत्पादन मिळते.

..

मध्यम कालावधीत येणारे सोयाबीन

जिल्ह्यातील बाजारपेठेत १०० ते १०५ दिवसांमध्ये उत्पादन देणारेही बियाणे आहेत. जमीन आणि पाण्याची उपलब्धता पाहून या बियाण्यांची पेरणी केली जाते. शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत.

..................

जास्त कालावधीत येणारे सोयाबीन

११० दिवसांच्या पुढे येणारे बियाणे हे टोकन पद्धतीने पेरले जाते. त्यामुळे कमी बियाण्यांमध्ये अधिक उत्पादन मिळते. अधिक काळ जोपासना केल्याने झाडांचा आकार आणि उंची वाढून उत्पादनही वाढताना दिसते.

..........

शेतकरी म्हणतात...

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीतून उत्पादन मिळत नाही. कापसाचा खर्च जास्त आहे. त्या तुलनेत भाव कमी मिळत आहे. त्यामुळे सोयाबीनकडे शेतकरी वळले आहेत. दरवर्षी सोयाबीनचा सरासरी दर चांगला मिळत आहे.

- विठ्ठल जाडकर

...

जिल्ह्यात यापूर्वी कापसाचा पेरा अधिक होत होता; परंतु, बोंडअळीमुळे नुकसान झाले. त्यात इतर रोगांचा प्रादुर्भाव वाढला; त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरण्यावर भर असून, सोयाबीननंतर दुसरे पीकदेखील घेता येते. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पर्याय घेतला.

- नितीन खंडागळे.

...

कृषी अधीक्षक म्हणतात

जिल्ह्यात कापूस सर्वाधिक क्षेत्रावर घेतला जात होता. मात्र, कापसाचे क्षेत्र या वर्षी घटले आहे. सरासरीच्या तुलनेत सोयाबीनचा पेरा वाढला आहे. क्षेत्र वाढण्यामागे अनेक कारणे असून, कमी कालावधीत येणारे पीक हे एक कारण आहे.

- बाबासाहेब जेजूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड.

...

गत पाच वर्षांत मिळालेले दर

वर्ष क्विंटलमध्ये दर

२०१७ ३२०० ते ४०००

२०१८ ३४०० ते ४५००

२०१९ ३८०० ते ५०००

२०२० ३००० ते ९०००

२०२१ १००० ते ११०० (अंदाजे).