या विलगीकरण केंद्राचे उद्घाटन परळी तहसीलचे नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विष्णुपंत देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे, सरपंच प्रतिनिधी पांडुरंग शेप, सिरसाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक उपसरपंच संदीप देशमुख यांनी केले. ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने स्थापन केलेल्या विलगीकरण कक्षाची त्यांनी सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन मुख्याध्यापक राहुल पोटभरे यांनी केले. शैलेंद्र पोटभरे यांनी आभार केले.
प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक विघ्ने, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुशील शिंदे व डॉ.विनोद गडदे,भागवत देशमुख,शैलेंद्र पोटभरे, रावसाहेब देशमुख, शरद देशमुख, अशोक देशमुख, बलभीम शेरकर, परमेश्वर आप्पा देशमुख, विलासराव देशमुख, बबन शेरकर, नितीन शिंदे, रवींद्र पोटभरेसह सर्व आजी, माजी ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.