रानडुकरांची धास्ती; बंदोबस्ताची मागणी
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रानडुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. शेतात रानडुकरे पिकांची नासाडी करीत आहेत. याचा मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. तसेच रानडुकरांच्या हल्ल्याची शेतकऱ्यांना भीती वाटते. वन विभागाने बंदोबस्ताची मागणी होत आहे, परंतु याकडे दुर्लक्ष करण्याची मागणी होत आहे.
रस्त्यावरील धुळीमुळे वाहनधारक त्रस्त
अंबाजोगाई : तालुक्यातील अनेक गावांमध्ये रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. समोरून वाहन गेल्यास समोरचे वाहन दिसत नसल्याने अपघातात वाढ होत आहे.
पर्यावरणास धोका; कारवाईची मागणी
माजलगाव : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा फटका पर्यावरणाला बसत असल्याचे चित्र गोदाकाठच्या नदी पात्रांमध्ये दिसत आहे. कारवाईची मागणी केली जात आहे. महसूल, पोलीस प्रशासनाचा वचक न राहिल्याने वाळू उपसा सुरूच आहे.
योजनेला हरताळ
अंबाजोगाई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून गरीब लाभार्थींना अन्न पुरवठा स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून होतो. पुरवठा होत असलेला गहू, तांदूळ हलक्या दर्जाचा आहे. अशा तक्रारी करूनही लक्ष दिले जात नाही. तक्रारीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
स्थानकात अस्वच्छता
अंबाजोगाई : येथील बसस्थानकात अस्वच्छता पसरल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पडलेले खड्डे, त्यात साठणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. तसेच मोकाट जनावरांचा प्रादुर्भावही असल्याने प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते.