रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार व युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकार हे दलित विरोधी सरकार असल्याचे मत पप्पू कागदे यांनी यावेळी व्यक्त केले. पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षणाचा प्रश्न तत्काळ मार्गी न लावल्यास युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा राज्यभर आंदोलन केले जाईल,अशी आक्रमक भूमिका आंदोलनकर्त्यांनी यावेळी घेतली.
यावेळी मझहर खान, राजू जोगदंड, किसन तांगडे,बापू पवार,अविनाश जोगदंड,अमर विद्यागर, महेंद्र वडमारे, सुभाष तांगडे, प्रभाकर चांदणे, दिलीप खंदारे, भाऊसाहेब कांबळे,भैय्या मस्के, सतीश शिनगारे, श्रीमंत जाधव, माजी. सरपंच नागेश शिंदे, दीपक अरुण,आप्पा मिसळे, भास्कर जावळे, अशोक दळवी आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली.
===Photopath===
070621\07_2_bed_13_07062021_14.jpeg
===Caption===
रिपाइंची निदर्शने