गेवराई : कृषी विज्ञान केंद्र खामगाव व किसान ॲपच्या माध्यमातून ६ मे रोजी आंतरपीक पद्धतीचे महत्त्व आणि फायदे या विषयावर एकदिवसीय ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात डॉ.शरद जाधव विषय विशेषज्ञ कृषी विद्या व डॉ.हनुमान गरुड विषय विशेषज्ञ कृषी विद्या यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.हनुमान गरुड यांनी केले, तसेच विविध पीकपद्धती नमूद करून त्याचे फायदे व आंतरपीक पद्धतीचे महत्त्व विषद केले. त्यानंतर, डॉ.शरद जाधव यांनी कोरडवाहू शेतीसाठी विविध आंतरपीक पद्धती व त्याचे महत्त्व सांगितले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कोरडवाहू शेतीसाठी वरदान ठरलेल्या विविध आंतरपीक पद्धतीच्या शिफारशी सांगितल्या. त्यामध्ये प्रामुख्याने कापूस सोयाबीन, कापूस मूग, कापूस उडीद, ज्वारी तूर, सोयाबीन तूर, कापूस तूर अशा आंतरपीक पद्धतीचा आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार अवलंब करावा, असे आवाहन केले.
कृषी विज्ञान केंद्र खामगाव चे कार्यक्रम समन्वयक डॉ.अजय किनखेडकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी किसान ॲपचे दीपक, तसेच डी.व्ही. इंगळे, कार्यक्रम सहायक संगणक यांनी परिश्रम घेतले.