लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पोलीस अधीक्षक कार्यालयासह जिल्ह्यातील २८ ठाण्यांची इंटरनेट सेवा मागील महिन्यापासून कोलमडली आहे. वारंवार दुरूस्तीची मागणी करूनही भारत संचार निगम लि.कडून (बीएसएनएल) कसलीच दखल घेतली जात नाही. यामुळे ठाण्यांतील कामकाजावर परिणाम होत असून पोलिसांना नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. बीएसएनएलच्या बेजबाबदार कारभाराचा फटका सर्वसामान्यांसह आता पोलिसांनाही सहन करावा लागत आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयासह जिल्ह्यातील प्रत्येक ठाण्यात बीएसएनएलची सेवा आहे. जनरल लाईन व सीसीटीएनएस लाईन अशा दोन लाईनचा यामध्ये समावेश आहे. परंतु मागील अनेक महिन्यांपासून बीएसएनएलकडून चांगली सेवा मिळत नसल्याने पोलीस ठाण्यातील ‘आॅनलाईन’ कारभार कागदावरच राहत आहे.प्रत्यक्षात ‘आॅफलाईन’ कारभार करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. विशेष म्हणजे सेवा चांगली देण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु त्यांनी या पत्राला केराची टोपली दाखविली आहे.
एसएनएलच्या या बेजबाबदार कारभारामुळे सर्वसामान्यांसह पोलिसांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बीएसएनएलच्या बेजबाबदार कारभाराचा फटका बसत असल्याने नागरिकांचा रोष वाढत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ग्रामीण भागातही नेटवर्क गायबपूर्वी बीएसएनएलची सेवा उपभोगणाºया ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. परंतु दिवसेंदिवस त्यांच्याकडून चांगली सेवा देण्यास उदासिनता असल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम त्यांच्या ग्राहकांवरही होत आहे. ग्रामीण भागात तर नेटवर्क मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.