शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

‘काही जण भाजपत गेल्याने फरक पडत नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 12:21 AM

काही मूठभर पदाधिकारी भाजपमध्ये गेले याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसवर होत नसतो सामान्य कार्यकर्ता राष्ट्रवादी सोबतच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तथा माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी केले.

ठळक मुद्देप्रकाश सोळंके : मोहखेडपेक्षा छत्रबोरगावातून मताधिक्याची आशा

माजलगाव : काही मूठभर पदाधिकारी भाजपमध्ये गेले याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसवर होत नसतो सामान्य कार्यकर्ता राष्ट्रवादी सोबतच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तथा माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी केले.माजलगाव तालुक्यातील छत्रबोरगाव येथे प्रकाश सोळंके यांच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी सभापती अशोक डक, जयदत्त नरवडे, रमेश सोळंके, विश्वंभर थावरे, छगन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. गावकऱ्यांना अभिवादन करत प्रकाश सोळंके यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.प्रकाश सोळंके म्हणाले, आपल्या ३२ वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत छत्रबोरगावला किमान शंभर वेळा तरी भेट दिलेली आहे. मात्र या निवडणुकीत छत्रबोरगावकरांनी केलेले अभूतपूर्व स्वागत मी कदापिही विसरू शकणार नाही माझ्यावर जे अफाट प्रेम ग्रामस्थांनी दाखवले. त्या ॠणात कायम राहणे पसंत करेल. माझे मूळ गाव मोहखेड पेक्षाही छत्रबोरगावमधून मताधिक्य मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. रॅलीनंतर झालेल्या जाहीर सभेत सोळंके म्हणाले, माझ्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत ग्रामीण भागाचा फार मोठा वाटा आहे. ग्रामीण भागातील सामान्य माणूसच माझ्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. त्यामुळे छत्रबोरगाव परिसरावर माझे विशेष प्रेम आहे. ग्रामस्थांनीही मला भरभरून दिलेले आहे. ग्रामस्थांच्या ॠणात सदैव राहण्याची आपली तयारी असून आमदार झाल्यानंतर छत्रबोरगावकरांच्या हाकेला ओ देऊन त्यांचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019majalgaon-acमाजलगांवNCPराष्ट्रवादी काँग्रेसPrakash Solankeप्रकाश सोळंके