कडा : रविवारी रात्री बीड -नगररोडवरून एक संशयास्पद टेम्पो जात असल्याचे समजताच आष्टी पोलिसांनी गस्तीवरील पोलीस व्हॅनला ही माहिती देऊन किनारा चौकात पकडला. सोमवारी सकाळपासून त्यात रेशनचा काळ्या बाजारात जाणारे धान्य असल्याचे बोलले जात असून याची तालुकाभर चर्चा आहे. आष्टी पोलिसांनी पकडलेल्या त्या टेम्पोत दडलयं काय? याची उत्सुकता लागली आहे. आष्टी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांना रविवारी रात्री एकच्या सुमारास गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार संशयास्पद टेम्पो (एमएच. १६, एई. ९६१६) हा पकडून आष्टी पोलीस ठाण्यात लावला. मग त्या ठिकाणी लावलेल्या टेम्पोत रेशनचे धान्य की अन्य काय याची चर्चा तालुकाभर झाली. याबाबत आष्टी येथील तहसीलदार शारदा दळवी यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, आष्टी पोलिसांना पत्र दिले असून, पंचनाम्यात नेमके त्या टेम्पोत काय आहे, ते समजेल असे त्यांनी लोकमतला सांगितले.
270721\27bed_6_27072021_14.jpg