- डॉ. रमाकांत निर्मळ,
या शैक्षणिक वर्षामध्ये कोरोनाने पालक, शिक्षक, अधिकारी, राज्यकर्ते यांची पुरेपूर भावनिक, आर्थिक, शारीरिक परीक्षा घेतलेली असल्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांचे फारसे काही पडलेले नाही. ऑनलाइन शिक्षण पॅटर्न एक दिखाऊ दिलासा बनून राहिला आहे. ज्या देशात अध्ययन, अध्यापन, संशोधनापेक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्राला अधिक महत्त्व दिले जाते, तिथे मनोमन कोणाचीही हरकत नसते हे कटू सत्य आहे.
- विवेक मिरगणे, प्राचार्य, बंकटस्वामी महाविद्यालय
कोरोनाचे संकट गंभीर आहे, पण विद्यार्थ्यांचे मूल्यांकन होणे आवश्यक आहे. सतत दोन वर्षेे आपण विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढच्या वर्गात नेऊन बसवतो आहोत. क्षमता प्राप्त न करता पुढच्या वर्गात नेऊन बसविणे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. स्वाध्याय पुस्तिका दिल्या असत्या तर विद्यार्थ्याला त्या वर्गाचा बऱ्यापैकी अभ्यास झाला असता.
- डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर
नाहीतरी शासन मुलांना सरसगट प्रमोट करत आहेच त्याऐवजी शालेय स्तरावर ऑनलाइन परीक्षा घेणे चांगले राहिले असते, ज्या मुलांकडे मोबाइल उपलब्ध होऊ शकत नाही त्यांना प्रमोट करणे योग्य राहिले असते. परीक्षा न घेता गुणवत्ता ठरवणार कशी ?
-प्रितम निराळे, पालक
दर वर्षी एक मे रोजी निकालाच्या आनंदापासून विद्यार्थी व पालक वंचित राहिले आहेत. मुलांची पुढील शिक्षणाची दिशा ठरते परंतु पहिली व दुसरीला परीक्षा न देता तिसरीला जाणारी मुले तसेच आठवी व नववीला परीक्षा न देता दहावीला जाणाऱ्या मुलांना पुढील शिक्षणात अडचणी येऊ शकतात. प्रत्येक कार्याचे मूल्यमापन झाले तरच केलेल्या कामाचे समाधान मिळते.
- विनायक जोशी, पालक
ही ढकलगाडी काय कामाची
इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत मुलांचे मूल्यमापन आकारिक व संकलित पद्धतीने केले जाते. दररोजची निरीक्षणे, प्रात्यक्षिक, खेळ, गृहपाठ, हस्ताक्षर तोंडी व लेखी चाचणीचा समावेश असतो तर निकाल श्रेणी व निरीक्षण स्वरूपात असतो. इयत्ता नववीसाठी चाचणी, प्रात्यक्षिक, तोंडी व लेखी स्वरूपाची परीक्षा घेतली जाते यामधून आपला पाल्य नेमका कुठे मागे पडतो किंवा कोणत्या विषयात त्याला जास्त आवड आहे हे कळण्यास मदत होते. मात्र परीक्षा न घेता पुढच्या वर्गात ढकलणे योग्य नाही, असे पालक, शिक्षणप्रेमी बोलतात.
---------
पहिली ५२४१५, दुसरी ५४१०५, तिसरी ५०४०२, चौथी ५१९९५, पाचवी ५३०२५, सहावी ५१७४३, सातवी ५१२८८, आठवी ४९५४०, नववी ४८८१९,