लोकमत न्यूज नेटवर्कबीड : माजलगाव तालुक्यातील जय महेश साखर कारखान्याकडे उसाचे पैसे देताना सुरुवातीला काही शेतक-यांना २०५० रुपये प्रतीटन प्रमाणे देयके अदा केली होती. मात्र त्यानंतर अनेक शेतक-यांची उसाची देयके १८०० रुपये प्रतीटनाप्रमाणे देण्यात आली होती, त्यामुळे शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. कारखान्याने शेतक-यांची दिशाभूल केली आहे, असा आरोप करत व्याजासह देयके देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे त्यामुळे शेतीवर आधारित असणाºया मजूर व शेतक-यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. तसेच मागील वर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे माजलगाव, गेवराई, बीड, यासह इतर सर्व तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढले होते. ते पूर्णपणे गाळप देखील करण्यात आले होते. मात्र गाळप केलेल्या उसाची देयके जय महेश साखर कारखान्याकडून काही शेतकºयांना २०५० रुपये प्रमाणे दिले होते. तर काही शेतकºयांना १८०० प्रमाणे दिले होते. त्यामुळे ज्या शेतकºयांना वाढीव भाव दिला नाही, त्यांना तात्काळ पैसे देण्यात यावे या मागणीसाठी मागील ११ महिन्यांपासून शेतकरीआंदोलन करत आहेत. मात्र कारखान्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही.साखर कायदा १९६६ नुसार कारखान्याचा गाळप झाल्यापासून १५ दिवसांनी शेतकºयांचे पैसे देणे अनिवार्य आहे. हा कायदा मोडीत काढत कारखानदारांनी जवळपास वर्षभरापासून शेतकºयांचे पैसे थकवलेले आहेत. त्यामुळे कारखान्याने कायद्याप्रमाणे उर्वरित २५० रुपये प्रती टनाप्रमाणे पैसे खात्यावर व्याजासह जमा करावेत, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाभरात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, युवा जिल्हाध्यक्ष राजू गायके पाटील, पं.स.सदस्य पूजा मोरे, राजेंद्र होके पाटील, धनंजय मुळे, वचिष्ठ बेडके, रोहिदास चव्हाण यांच्यासह गेवराई, माजलगाव, वडवणी या भागातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आंदोलकांनी दणाणून सोडला होता.
जय महेश साखर कारखान्याने केली दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:26 AM
कारखान्याने शेतक-यांची दिशाभूल केली आहे, असा आरोप करत व्याजासह देयके देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देव्याजासह २०५० रुपये देण्याची मागणी : शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन