बीड : जागतिक मधुमेह दिनाच्यानिमित्ताने जिल्हा रूग्णालयात जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मधुमेह टाळण्यासाठी व्यायामासह आवश्यक ती काळजी घेण्यासंदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक मधुमेह दिन जिल्हा रूग्णालयात साजरा करण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ.आय.व्ही. शिंदे, डॉ. अजयकुमार राख, डॉ.पवन राजपूत, डॉ.अशीष कोठारी, डॉ.नितेश गवते यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी मधुमेह आणि रक्तदाब दोन्हीही आजार असलेल्या रूग्णांना किडणी, त्वचासारखे आजार जडण्याची भिती असते. त्यामुळे वेळच्यावेळी तज्ज्ञांकडून तपासणी करून उपचार करून घेण्याची गरज असल्याचे सांगितले. डॉ.अजयकुमार राख यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सुरेश दामोधर, ऋषीकेश शेळके, योगीराज गाडेकर यांच्यासह रूग्ण, डॉक्टर, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी डॉक्टर, कर्मचारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.