परळी/सिरसाळा : जायकवाडी धरणाचेपाणी गुरु वारी सकाळी डिग्रस, पोहनेर येथील गोदावरी नदीच्या पात्रात पोहचले आहे. २ वर्षांपासून गोदावरी नदीचे पात्र कोरडे होते. आता पात्रात पाणी येणे सुरू झाल्याने शेतकरी आनंदित होत आहे.तालुक्यातील डिग्रस, पोहनेर, तेलसमुख, बोरखेड या चार गावातून गोदावरी नदी जाते. पैठण येथील जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी आज सकाळी ६.४५ वाजता परळी तालुक्यातील डिग्रस या गावी पोहचले आहे. यानंतर पोहनेरला दुपारी पाणी आले. तेलसमुख व बोरखेड या गावातून सोनपेठ तालुक्यातील विटा व गंगाखेडवरून नांदेडला जाते. यामुळे परळी, पाथरी, सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठी असलेल्या गावांचा आणि परिसरातील १५ ते २० गावांतील शेतीसाठीचा आणि पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होत आहे. मागील २ वर्षांपासून गोदावरी नदीचे पात्र कोरडे होते.गोदावरी नदी वरील बंधारा अपूर्ण ेतालुक्यातील पोहनेर येथील गोदावरीवरील बंधारा १५ वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आला आहे. परंतु त्याचे संपूर्ण काम झालेले नाही. वास्तविक पाहता नाशिक ते तेलंगणा बॉर्डरपर्यंत गोदावरीच्या पात्रात एकूण छोटे सरासरी १५ ते २० बंधारे २२००५ साली मंजूर करण्यात आले होते. त्यातील पोहनेर/तारगव्हाण हा एकमेव बंधारा अपुर्ण आहे.हा बंधारा झाला असता तर १५ हजार हेक्टरच्यावर जमीन सिंचनाखाली आली असती आणि ढालेगाव -पोहनेर २० किमी पाणी गोदावरीमध्ये अडले असते. पात्राच्या दोन्ही बाजूचे गाव मिळून परिसरातील ५० ते ६० गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असता, परंतु पाणी पोहनेरला येऊनही पुढे वाहून जाणार आहे, अशी कैफियत पोहनेरचे अॅड. रमेश साखरे यांनी मांडली. निधी नसल्याने हे काम अपूर्ण असल्याचे हिवरा गावचे माजी सरपंच राजाभाऊ निर्मळ यांनी म्हटले आहे.
जायकवाडीचे पाणी डिग्रस, पोहनेर येथे आल्याने आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 12:06 AM