लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राजमाता जिजाऊ जन्मोत्सवात बुधवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेमध्ये बीडमधील ४८ शाळांतील २२ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सुंदर चित्र रेखाटले.बीड शहरामध्ये यावर्षी तुम्ही-आम्ही बीडकर च्या माध्यमातून माँसाहेब जिजाऊ यांचा जन्मोत्सव साजरा होत आहे. या तीन दिवसीय जन्मोत्सवात विविध स्पर्धा घेतल्या जात आहेत. चित्रकला स्पर्धेनंतर सूर्या लॉन्स येथे मेंदी व रांगोळी स्पर्धा झाली. या स्पर्धेसाठी बीडमधील ५८० महिला, तरुणींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे बक्षीस वितरण मुख्य कार्यक्रमात करण्यात येणार आहे.गुरुवारी सकाळी जिजाऊ उद्यान येथे सकाळी ७ वाजता जिजाऊ दौड आयोजित केली आहे. सायंकाळी ६ ते १० या वेळेत सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स परिसरात शिवशाहीर नंदेशजी उमप यांचा पोवाडा व लोकधारा लोकगीतांचा कार्यक्रम होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
बीड शहरामध्ये जिजाऊ जन्मोत्सव; चित्रकला, रांगोळी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 1:06 AM