अंभोरा : ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचं देणं किंवा ऋण आपल्यावर असतं व ते प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या स्वरुपात फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे व सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे, हा उद्देश मनात धरून स्वामी विवेकानंद संस्थेचे चेअरमन मारुती पठाडे यांनी कोविड सेंटरला आर्थिक मदतीचा हात देऊन एक मोलाचा संदेश समाजाला दिला आहे. कितीही पैसा कमवला तरी तो शेवटी बरोबर येत नाही. मात्र, समाजातील दुर्बल घटकांना व गरजू व्यक्तींना जर मदतीचा हात दिला तर तो मोलाचा ठरतो. मागील महिन्यामध्ये स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमन मारुती पठाडे यांना कोविडची लागण झाली होती. ते जामखेड ग्रामीण आरोग्य प्रकल्प, जामखेड येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होते. याठिकाणी ते आजारातून पूर्णपणे बरे झाले. आजारातून बरे झाल्यानंतर एक महिन्याने आपल्यावर ज्या सेंटरमध्ये उपचार झाले, त्या सेंटरला आर्थिक मदतीचा हात देण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये आला व लगेच त्यांनी या कोविड सेंटरला अकरा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. या मदतीमुळे याठिकाणी गोरगरीब जनतेवर होणाऱ्या उपचारांसाठी फूल ना फुलाची पाकळी म्हणून या मदतीचा उपयोग होऊ शकेल.
माझ्यासारखीच आपल्या कुवतीप्रमाणे प्रत्येकाने गोरगरिबांना, समाजातील दुर्बल घटकांना थोडीफार का होईना मदत केली पाहिजे व सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे, असे आवाहन पठाडे यांनी केले. कोविड सेंटरला आर्थिक मदतीचा हात देऊन पठाडे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
===Photopath===
280421\img-20210427-wa0116_14.jpg