केज : सध्या दुष्काळी परस्थिती असल्याने गावाजवळील तळ्यातील गाळ आपल्या शेतात टाकणे दोन शेतकऱ्यांच्या जिवावर बेतले. सर्जेराव बब्रुवान धपाटे (४५), परमेश्वर हरदास धपाटे (२५) या काका पुतण्याला शेतात गाळ टाकत असलेल्या मातीच्या टिप्परने चिरडले. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना केज तालुक्यातील भाटुंबा येथील दरा या शेतात बुधवारी मध्यरात्री घडली.केज तालुक्यातील भांटूबा-जवळबन या तळ्यातील गाळ आपल्या शेतात घेऊन येणाºया एका टिप्परने (एमएच ४२ - ०८७०) गाळाच्या ढिगाºयाच्या बाजूला दुसरे टिप्पर खाली करण्यासाठी टिप्पर मागे घेत गाळ खाली केला. पण याच ठिकाणी गाळाच्या खेपांची नोंद करण्यासाठी थांबलेले दोघे चुलते-पुतणे अडकले. इकडे ते दिसेनात म्हणून टिप्पर चालक खाली उतरुन दोघांना बघत असतानाच त्याला गाळाच्या ढिगाºयाखाली हे दोघे दबलेल्या अवस्थेत दिसले. ही घटना टिप्पर चालकाच्या लक्षात येताच त्याने आपल्या टिप्पर एजंटला माहिती दिली. त्यानंतर तो टिप्पर घेऊन रात्रीच पसार झाला. या घटनेची माहिती भांटूबा गावात होताच सकाळी या गाळात दबलेल्या दोघांना जेसीबीच्या साह्याने बाहेर काढले. त्यानंतर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह आणले. डॉ. अरुण भिसे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. या घटनेने भांटूब्यावर शोककळा पसरली आहे. युसुफवडगाव पोलीस ठाण्यात टिप्पर चालकाविरोधात गुन्हा नोंद केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
भाटुंब्यामध्ये गाळाखाली दबून काका-पुतण्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:15 IST
सध्या दुष्काळी परस्थिती असल्याने गावाजवळील तळ्यातील गाळ आपल्या शेतात टाकणे दोन शेतकऱ्यांच्या जिवावर बेतले. सर्जेराव बब्रुवान धपाटे (४५), परमेश्वर हरदास धपाटे (२५) या काका पुतण्याला शेतात गाळ टाकत असलेल्या मातीच्या टिप्परने चिरडले.
भाटुंब्यामध्ये गाळाखाली दबून काका-पुतण्याचा मृत्यू
ठळक मुद्देटिप्परचालक फरार : युसूफ वहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल