धानोरा/अंभोरा : चार दिवसांपूर्वी आष्टी तालुक्यातील सावरगाव परिसरामध्ये अतिवृष्टी झाल्याने कांबळी नदीवरील सावरगाव, वेलतुरी, कढाणी प्रकल्प तुडुंब भरली आहेत. शनिवारी रात्री पुन्हा या परिसरात धुवाँधार पाऊस झाला. पुन्हा एकदा सुलेमान देवळा, पिंपरखेड येथील पुलावरून पाणी आल्याने या गावांचा अनेक गावांशी संपर्क तुटला होता. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
धानोरा, हिवरा, पिंपरखेड, सुलेमान देवळा, गौखेल, म्हसोबावाडी, वेलतुरी, सावरगाव
या परिसरात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस पडला. या पूर्वीच्याच पावसाने नदीला भरपूर पाणी होते. मात्र, रात्रीच्या पावसाने पुलावरून ओसंडून पाणी वाहत असल्यामुळे ग्रामस्थांना शेतात जाणेही शक्य झाले नाही. वाड्यावस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांचा गावांशी संपर्क तुटला आहे. या नदीवरील पिंपरखेड येथील धानोरा-सावरगांव व सुलेमान देवळा रस्त्यावरील सुलेमान देवळा येथील पूल कमी उंचीचा आहे. यामुळे सध्या पुलावरून पाणी वाहत आहे. रविवारी रात्रीही पुलावरून पाणी ओसरले नव्हते. पावसाची शक्यता लक्षात घेता, नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
050921\balasaheb raktate_img-20210905-wa0096_14.jpg
धानोरा-सावरगाव रस्त्यावरील पिंपरखेड व सुलेमान देवळा येथे कांबळी नदीला पूर आल्याने पुलावरुन पाणी वहात आहे. यामुळे या गावांचा अनेक गावांशी संपर्क तुटला आहे.