परळी : परळी परिसर व मराठवाड्यात सुपर्जन्य वृष्टी होऊन दुष्काळ दूर व्हावा यासाठी कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य यांच्या अनुज्ञेने २ ते ११ जूनदरम्यान पर्जन्ययागाचे आयोजन केले आहे. यासाठी मुंबई व हैद्राबाद येथील वेद पंडितांचे आगमन झाले आहे.येथील कल्याणमंडपात पर्जन्य यागासाठी पाण्याचा हौद बांधण्यात आला असून या हौदात दीड तास उभे राहून ११ वेद पंडित जप करीत आहेत. रविवारपासून या पूजेस प्रारंभ झाला आहे. ११ जूनपर्यन्त जप, हवन व स्फटीक शिवलिंगाची स्थापना दररोज होणार आहे.जयेंन्द्र सरस्वती स्वामी व विजेंद्र स्वामी यांच्या संकल्पनेतून देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाच्या मंदिर परिसरात पर्जन्य यागाचे आयोजन केले आहे. गेल्या वर्षी कांचीकामकोटी पिठाच्या वतीने घृष्णेश्वर येथे पर्जन्ययाग करण्यात आला.परळी येथील कल्याण मंडपात रविवारी सकाळी कलशपूजा करण्यात आली. पाण्याच्या हौदात उतरु न दीड तास जप व बाहेर दीड तास हवन करण्यात आले. स्फटीक शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. ११ जून रोजी प्रभू वैद्यनाथाला अभिषेक करुन या कार्यक्रमाची सांगता होणार असल्याची माहिती मठाचे एस.श्रीधर (मुंबई) यांनी दिली. यावेळी औरंगाबाद येथील कुमार पेड्डी, वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे राजेश देशमुख, प्रा. बाबासाहेब देशमुख, विश्वस्त प्रा. प्रदीप देशमुख, बाबूराव मुंडे आदी उपस्थित होते.तसेच पाटोदा तालुक्यातील इंदुवासीनी देवी संस्थान, पिंपळनेर येथील महान संन्यासी साधू आणि वारकरी सांप्रदायाचे अध्वर्यू स्वानंद सुखनिवासी वै. आचार्य स्वामी गणेशानंद सरस्वतीजी महाराज यांच्या १५ व्या पुण्यतिथीनिमित्त पर्जन्य महायागासह शतचंडी यज्ञ, होमहवन आदी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
दुष्काळ निवारणासाठी परळीमध्ये कांची कामकोटी पीठातर्फे पर्जन्ययाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 12:17 AM
परळी परिसर व मराठवाड्यात सुपर्जन्य वृष्टी होऊन दुष्काळ दूर व्हावा यासाठी कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य यांच्या अनुज्ञेने २ ते ११ जूनदरम्यान पर्जन्ययागाचे आयोजन केले आहे.
ठळक मुद्देरविवारपासून सुरुवात : ११ वेद पंडितांचा हौदात दीड तास जप