शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

करुणा शर्मा यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 1:35 PM

पोलिसांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती परंतु न्यायालयाने करुणा शर्मा यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

- अविनाश मुडेगावकर 

अंबाजोगाई : जातीवाचक शिवीगाळ करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झालेल्या करूणा शर्मांना ( Kruna Sharma ) अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी तर अरुण मोरे यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. ( Karuna Sharma remanded in judicial custody for 14 days) 

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तालुका संयोगिनी विशाखा रविकांत घाडगे यांच्या फिर्यादनुसार जातीवाचक शिवीगाळ का करत आहेस असा जाब विचारल्याने रविवारी (दि.०५) दुपारी १.३० वा. वैद्यनाथ मंदिर परिसरात करूणा शर्माने (रा. मुंबई) बेबी छोटुमियां तांबोळी हिच्या उजव्या हातास धरून खाली पाडले. त्यामुळे तिच्या उजव्या हातास जखम झाली. यावेळी अरूण दत्तात्रय मोरे (रा. मुंबई) याने त्याच्या हातातील चाकूने गुड्डू छोटूमियां तांबोळी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने पोटावर वार केला व घाडगे यांना जातीवाचक शिवागाळ केली. सदर फिर्यादीवरून दोन्ही आरोपींवर कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४ सह ॲट्राॅसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. करूणा शर्मा यांना अटक करून सोमवारी अंबाजोगाई सत्र न्यायलयासमोर हजर केले. पोलिसांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती परंतु न्यायालयाने करुणा शर्मा यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी तर अरुण मोरे यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

करुणा शर्मांसह एकास ॲट्रॉसिटी व खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटक

करुणा शर्मा यांनीच मांडली स्वतःची बाजूया प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने सहा. सरकारी अभियोक्ता अशोक कुलकर्णी यांनी काम पाहिले. तर, करुणा शर्मा यांचे वकील पोहोचू न शकल्याने त्यांनी न्यायालयासमोर स्वतः बाजू मांडली.

न्यायालय परिसरात गर्दीकोरोना शर्मा यांना न्यायालयात हजर करण्यासाठी सकाळी आणले असता न्यायालय परिसरात त्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली होती.मात्र अगोदर पासुनच पोलीस बंदोबस्त असल्याने पोलिसांनी प्रवेश द्वारावरच कडक पहारा ठेवल्याने अनेकांचा हिरमोड झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDhananjay Mundeधनंजय मुंडेPoliceपोलिसCourtन्यायालयBeedबीड