अविनाश मुडेगावकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : केज विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचे होमपीच असतानाही केजकरांनीच भाजपला मताधिक्य देवून सोनवणे त्यांचा विजयाकडे जाण्याच्या मार्गात अडसर निर्माण केला. केज विधानसभा मतदार संघात भाजपाला जितके मताधिक्य मिळाले तितकीच मते बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवाराने घेतल्याने वंचित आघाडीच्या मतांचा फटका ही सोनवणे यांना बसला. केज मतदार संघात राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची अनेक सत्तास्थाने असतानाही भाजपाची वाढते मताधिक्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चिंतन करायला लावणारे आहे.बीड लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीत केज विधानसभा मतदार संघात भाजपाच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांना १ लाख १६ हजार २२९, बजरंग सोनवणे यांना ९५ हजार २९३, वंचित आघाडीचे प्रा. विष्णू जाधव यांना २० हजार ९०८ मते मिळाली. प्रीतम मुंडे यांनी २० हजार ९३६ मताधिक्य या मतदार संघात घेतले. बहुजन वंचित विकास आघाडीची मते व प्रीतम यांचे मताधिक्य याचाही फटका सोनवणे यांना बसला.केज विधानसभा मतदार संघात अंबाजोगाई व केज हे दोन मोठी शहरे आहेत. यातील अंबाजोगाई नगर परिषद व केज नगर पंचायत दोन्ही ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. या शिवाय काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात अंबाजोगाई पंचायत समिती, अंबाजोगाई बाजार समिती तर केज मतदार संघात बजरंग सोनवणे व त्यांच्या पत्नी सारीका सोनवणे हे दोघे ही जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीची मजबूत ताकद रमजबूत असतानाही सोनवणे यांना मोठा फटका बसला. केजकरांनी त्यांचा विजयाकडे जाणाऱ्या रथाला मोठा अडसर निर्माण केला.एकही मोठी न झालेली सभाकेज विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकही मोठी जाहीर सभा झाली नाही.पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, अथवा पक्षाच्या अन्य मोठ्या नेत्यांच्या सभा या परिसरात झाल्या असत्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद मजबूत होण्यासाठी पाठबळ मिळाले असते.मात्र, या मतदार संघात एकही मोठी सभा न झाल्याचा फटका ही सोनवणे यांना बसला असावा अशी चर्चा आता मतदार संघात सुरू आहे.३४ अपक्षांनी घेतली ८ हजार ८२८ मतेकेज विधानसभा मतदार संघात भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन वंचित विकास आघाडी अशी तिरंगी लढत झाली. ३७ उमेदवारांपैकी इतर ३४ अपक्षांना केवळ ८ हजार ८२८ मतांवर समाधान मानावे लागले.
केजकरांनीही दिली नाही बजरंग सोनवणेंना साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:13 AM
केज विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचे होमपीच असतानाही केजकरांनीच भाजपला मताधिक्य देवून सोनवणे त्यांचा विजयाकडे जाण्याच्या मार्गात अडसर निर्माण केला.
ठळक मुद्देकेज विधानसभा मतदार संघामध्ये वंचित आघाडीचाही सोनवणेंना फटका