शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

केंद्रेवाडी भूगर्भातील गूढ आवाजाने हादरली; ग्रामस्थांनी भीतीने रात्र जागून काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 6:52 PM

आवाज पंचक्रोशीत दूरपर्यंत ऐकू येत असल्याचे परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी येथे भुगर्भातून गूढ आवाज येऊ लागल्याने या परिसरातील ग्रामस्थ भयभीय झाले आहेत.या घटनेची माहिती महसूल प्रशासनास प्राप्त होताच उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांना सुरक्षिततेच्या उपाययोजना सुचविल्या.व भूगर्भ शास्त्रज्ञांना या घटनेची माहिती दिली. मात्र या गूढ आवाजाच्या भीतीने ग्रामस्थांनी सोमवारची रात्र जागून काढली.

अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी येथे सोमवारपासून भूगर्भातुन गूढ आवाज येत आहेत. या आवाजाने ग्रामस्थ भयभीत झाले. आवाज सातत्याने येऊ लागल्याने या घटनेची माहिती केंद्रेवाडीच्या सरपंच योगिता बाळासाहेब केंद्रे यांनी प्रशासनास दिली. मंगळवारी सकाळी उपजिल्हाधिकारी शरद झाडके,तहसीलदार विपिन पाटील व महसूलच्या पथकाने केंद्रेवाडी येथे जाऊन भेट दिली व परिसराची पाहणी केली. असे आवाज पंचक्रोशीत दूरपर्यंत ऐकू येत असल्याचे परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सुरक्षितता बाळगण्याचे आवाहनभुगर्भातून गूढ आवाज येत असल्याने ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये सुरक्षिततेचा उपाय म्हणून ग्रामस्थांनी कच्या घरात न थांबता पक्या घरात थांबावे.अश्या सुचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या.तर या गूढ आवाजा संदर्भात भूगर्भ शास्त्रज्ञ यांना ही माहिती दिली असुन ते या भागाची पाहणी करण्यासाठी येत आहेत. असे उपजिल्हाधिकारी झाडके यांनी सांगितले. तर ज्या ग्रामस्थांकडे  पक्के घरे नाहीत अशा ग्रामस्थांना शाळेत राहण्याची सुविधा गावच्या सरपंच योगिता केंद्रे यांनी उपलब्ध करून दिली आहे.

३३ वर्षांपूर्वी ही आले होते असे गूढ आवाजकेंद्रेवाडी व परिसरातील गावांमध्ये अशा प्रकारचे गूढ आवाज ३३ वर्षांपूर्वी ही आले होते.त्या काळात अनेक जुनी घरे पडली होती.त्यानंतर १९९१ साली किल्लारी व परिसरात भुकंप झाला होता. असे या परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र काल पासुन पुन्हा असे आवाज येऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

परिसराची तात्काळ पाहणी करावीसोमवारपासून भूगर्भातून गुढ आवाज येत असून मध्यरात्री मोठा आवाज झाला आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे गूढ आवाजा बाबत भूजल सर्व्हेक्षण अधिकारी यांना त्वरित पाहणी करण्यासाठी केंद्रेवाडी, येथे पाठवावे व उच्चस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत पाहणी करण्याबाबत सूचना द्याव्यात, असे पत्र आ. नमिता मुंदडा यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

हेही वाचा - - जोरदार पावसाने परळी- अंबाजोगाई रस्ता बंद- video : पुराच्या पाण्यात स्टंटबाजीची हौस; कुपटा येथील दोघे थोडक्यात बचावले- Video : थरारक ! नदीच्या पुरात जीप वाहून गेली; एका प्रवाशाने झाडावर चढून वाचवला जीव 

टॅग्स :BeedबीडEarthquakeभूकंप