लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : शेतीची पेरणीपूर्व मशागत करून पावसाची वाट पाहत असलेल्या शेतक-यांनी पंधरा दिवसांत तीस हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी केली आहे. असे असले तरी समाधानकारक पाऊस नसल्याने ६५ हजार हेक्टर क्षेत्राला पेरणीची प्रतीक्षा आहे.
थोड्या फार झालेल्या पावसावर शेतकरी घाईत पेरण्या उरकू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आष्टी तालुक्यात खरिपाच्या पेरणीसाठी ९५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. तालुक्यातील शेतक-यांनी खरिपाच्या पेरणीची गडबड न करता पुरेशी ओल झाल्यावरच पेरणी करावी. नसता दुबार पेरणीचे संकट ओढवले जाईल. यासाठी कृषी विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी केले आहे.