बीड: शहरातील गजबजलेल्या सम्राट चौकाजवळील एका बंद खोलीत राजरोस सुरु असलेल्या चक्री जुगारावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ६ ऑक्टोबरला छापा टाकला. १५ दिवसांपूर्वीच पथकाने या जुगार अड्ड्यावर धाड टाकली होती. यामुळे निगाहें या सनी देओल व श्रीदेवी यांच्या गाजलेल्या चित्रपटातील खेल वही फीर आज तू खेला.... या गीतांची आठवण झाली अन् अवैध धंदेवाल्यांची मुजोरी देखील चव्हाट्यावर आली.
शहरातील सम्राट चौकातील एका मोबाइल शॉपीमागे खोलीत चक्री जुगार सुरु असल्याची माहिती मिळाल्यावरुन २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसत वाजता पोलीस अधीक्षकांच्या पथकाचे प्रमुख व सहायक निरीक्षक विलास हजारे यांनी कारवाई केली होती. तेव्हा सात जणांना रंगेहाथ पकडून चक्रीचा आयडी देणाऱ्रूा बंडू कदमसह आठ जणांवर गुन्हा नोंदविला होता. मात्र, या कारवाईनंतरही हा जुगारअड्डा पुन्हा सुरु झाल्याचे कळाल्यावर पोलीस अधीक्षकांच्या सूचनेवरुन पथकाने ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पावणेसात वाजता धाड टाकली. यावेळी
फारुख नसीर शेख (रा. मसरतनगर, बीड), शेख जमीर शेख सादीक (रा. खासबाग देवी मंदिराजवळ,बीड ), अनिकेत जीवन पुरी (रा. पालवण, ता. बीड ), अमोल संजय बारस्कर (रा. एकनाथनगर, बीड ) ,अमर वसंत भानुसे (रा. कॅनॉल रोड, बीड), खलील बशीर बागवान (रा. नेहरूनगर, कबाड गल्लीख बीड), ऋतिक पंडित रकटे (रा. संस्कार कॉलनी, गयानगर, बीड), शनि एकनाथ रंजे( रा. अंबिका चौक, बीड ), अनिल सुंदरराव मुळे (रा. एमआयडीसी, पेठ बीड) यांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले.
अड्डा तोच अन् काही जुगारीसुध्दा तेचआरोपींकडून १९ हजार ४२० रुपये रोख, मोबाइल, कॉम्प्युटर असा एकूण एक लाख एक हजार ८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पकडलेल्या नऊ जणांसह आयडी पुरविणारा बंडू कदम व चक्री जुगारअड्डा चालविणाऱ्रूा आसेफ शेख (रा.मसरतनगर, बीड) या दोहोंसह एकूण ११ जणांवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. विशेष म्हणजे १५ दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईवेळी सापडलेलेच काही जुगारी पुन्हा दुसऱ्या छाप्यात आढळले आहेत.