लोकमत न्यूज नेटवर्ककिट्टी आडगाव : शेतक-यांचे जुने कर्ज माफ करा आणि शेतक-यांना नवीन कर्ज त्वरित द्या, या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर १ जानेवारील रोजी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.या मोर्चा प्रंसगी भाई गंगाभिषण थावरे यांनी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शेतकºयांचे मनोगत ‘फिटलं आणि मिटलं’ या मागणीचे निवेदन महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा किट्टी आडगाव यांना दिले. चार ते पाच वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयांना दुष्काळाचा सामना करावा लागत असल्यामुळे शेतकरी शासनाकडून आणि बँकेच्या आरेरावीपणामुळे वेठीस धरला जात आहे.शासनाच्या आरेरावीपणामुळे झालेले उत्पन्न घरातही ठेवता येत नाही आणि बाजारातही विकले जात नाही. या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण? अस प्रश्न निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. या सर्व मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने भाई गंगाभिषण थावरे यांनी शेतकºयांच्या पाठीशी उभे राहून शेतकºयांचे पहिले कर्ज माफ करावे आणि त्वरित नवीन कर्ज देण्यात यावे या करीता ‘फिटलं आणि मिटलं’ या मागणीचे निवेदन मोर्चा काढून बँकेला देण्यात आले. या मोर्चामध्ये बैलगाड्यांसह शेतकरी सहभागी झाले होते.शेतकºयांनी आमचे पहिले कर्ज माफ करा आणि दुसरे कर्ज त्वरित द्या, दुष्काळी अनुदान माणसी पाच हजार रूपये देण्यात यावे, जनावरांना चारा दावणीला देण्यात यावा. या घोषणांसह सरकारच्या नावाने घोषणा देत आंदोलन करण्यात आले. गुराढोरांसह अन्नत्याग, सत्याग्रह सकाळी १० वाजल्यापासून ते ४ वाजेपर्यंत सुरू होते. या मोर्चामध्ये सहभागी सर्कलमधील नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी माजलगाव ग्रामीण ठाण्याचे उपनिरीक्षक सोमनाथ नरके, फौजदार विकास दांडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त होता.
किट्टी आडगाव ग्रामीण बँकेवर ‘फिटलं आणि मिटलं’ मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 12:16 AM
शेतक-यांचे जुने कर्ज माफ करा आणि शेतक-यांना नवीन कर्ज त्वरित द्या, या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर १ जानेवारील रोजी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.
ठळक मुद्देसहा तास आंदोलन : सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांची घोषणाबाजी