अंबाजोगाई : येथील खोलेश्वर महाविद्यालयातर्फे बुधवारी घेतलेल्या नाना पालकर स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नाईट कॉलेज ऑफ इचलकरंजी या महाविद्यालयाने फिरता चषक पटकावला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती.
या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष होते. यावर्षीही राज्याच्या विविध विभागांतून ५४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे विषय : नवीन शैक्षणिक धोरण-परिवर्तनाची नांदी, असे देह हा राष्ट्रकार्यार्थ माझा, शहाण्यांनो..! राजकारणात या, कोरोनाने केले शहाणे या विषयांवर ही स्पर्धा झाली. यातील सहभागी स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र देण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे कार्यवाह नितीन शेेटे यांच्या उपस्थितीत झाले. याप्रसंगी अॅड. किशोर गिरवलकर, बिपीन क्षीरसागर, राम कुलकर्णी, प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, शहर संघचालक दत्तप्रसाद रांदड यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. प्रल्हाद तावरे व प्रा. दत्तप्रसाद गोेस्वामी यांनी केले. या स्पर्धेचे परीक्षण प्रा.डॉ. संपदा कुलकर्णी, भारतराव मदने, गोरख शेंद्रे यांनी केले.
स्पर्धेतील वैयक्तिक विजेते : समीक्षा ज्ञानेश्वर आव्हाळे, प्रथम (सर परशुराम भाऊ महाविद्यालय, पुणे) पारितोषिक : रोख रक्कम ३५०१ रुपये व सन्मानचिन्ह, अक्षय मारोती लिके, द्वितीय (नाईट कॉलेज ऑफ इचलकरंजी) पारितोषिक : रक्कम २५०१ रुपये व सन्मानचिन्ह, पूजा शीतलनाथ रोकडे, तृतीय (शिवाजी महाविद्यालय, रेणापूर) पारितोषिक : रोख रक्कम १५०२ रुपये व सन्मानचिन्ह.
===Photopath===
140321\avinash mudegaonkar_img-20210311-wa0093_14.jpg
===Caption===
अंबाजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयाच्या वतीने स्व. नाना पालकर स्मृती आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आल्या. त्यावेळी बोलताना कार्यवाह नितीन शेटे, व्यासपीठावर इतर मान्यवर