बीड शहरातील शाहूनगर भागातील गोदावरी परमेश्वर फिरंगे (वय ६७) या २ मार्च २०२१ रोजी शेजाऱ्यांसह संकष्ट चतुर्थीनिमित्त नवगण राजुरी येथील गणपती मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. या ठिकाणी दर्शनरांगेत असताना गर्दीचा फायदा घेत चोरांनी त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण चोरट्याने लांबवले होते. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गोदावरी फिरंगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांनी त्यांची टीम पाठवत तपासाची चक्रे फिरविल्यानंतर आरोपी नीलाबाई सुखदेव जाधव या महिलेकडून दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण तपासात २६ मार्च २०२१ रोजी हस्तगत केले होते. त्यानंतर पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस करीत होते. तक्रारदाराने ज्या ठिकाणावरून हे गंठण खरेदी केले होते. त्याच्या पावत्या व ओळखपत्र न्यायालयात सादर केले.
सदरील गंठण मिळविण्यासाठी गोदावरी फिरंगे यांच्या वतीने बीड येथील ॲड. ए. बी. केंगार यांनी बीडच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी झाली. यावेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. सी. बोरफळकर यांनी ४ मे २०२१ रोजी सदरील गंठण तक्रारदारास परत देण्याचे आदेश बीड ग्रामीण पोलिसांना दिले होते. दरम्यान, बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात २१ मे २०२१ रोजी तक्रारदार गोदावरी परमेश्वर फिरंगे यांना बोलावून घेऊन पोलीस निरीक्षक संतोष साबळे, बीट जमादार राेकडे, सुतार यांच्या उपस्थितीमध्ये सन्मानपूर्वक देण्यात आले. यावेळी गंठण स्वीकारताना गोदावरी फिरंगे यांच्या डोळ्यात क्षणभर आनंदाश्रू तरळले. यावेळी गोदावरी फिरंगे व सेवानिवृत्त वनपाल सखाराम कदम, परमेश्वर फिरंगे यांनी पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीचे स्वागत केले.
===Photopath===
210521\21_2_bed_8_21052021_14.jpeg
===Caption===
बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोनि संतोष साबळे यांनी गंठण सुपूद केले.