कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे संचालक दादासाहेब कराड हे उपस्थित होते. यावेळी कराड यांनी दीनयाल शोध संस्थान व भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या कार्याविषयी माहिती दिली. तसेच स्वच्छतेविषयी म्हणाले की, प्रत्येक महिलेने घराची, परिसराची व वैयक्तिक स्वच्छता ही दररोज केली पाहिजे.
मार्गदर्शन करताना शोभा साकसमुद्रे यांनी, कोरोनाची सध्या भयानक स्थिती आहे. कोरोनापासून आपला बचाव करायचा असेल तर प्रत्येकाने लस घेऊन प्रतिकारशक्ती वाढवली पाहिजे. प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर नियमितपणे वापरले पाहिजे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप जनशिक्षण संस्थानचे संचालक गंगाधर देशमुख यांनी केला. अध्यक्षीय समारोपात स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले. सर्वप्रथम प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनाची स्वच्छता केली पाहिजे. प्रत्येक घरातील महिलांनी घर, अंगण, परिसर दररोज स्वच्छ केले पाहिजे, असे देशमुख यांनी सांगत उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.
सूत्रसंचालन व प्रास्ताविक धर्मराज जाडकर यांनी केले. प्रास्ताविकात १५ ते ३० जुलै दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली. आभार रोहिणी शेटे यांनी मानले.
180721\18_2_bed_5_18072021_14.jpg
केज येथे कार्यक्रम